Russian MP death Odisha: रशियन खासदाराच्या मृत्यूचे गूढ वाढले! हिंदू पद्धतीने अंत्यविधी का? वेगळा संशय बळावला...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 01:51 PM2022-12-29T13:51:01+5:302022-12-29T13:56:32+5:30
Russian MP death Odisha: व्लादिमीर पुतिनचे कट्टर टीकाकार असलेल्या रशियन खासदाराचा ओडिशामध्ये संशयास्पद मृत्यू झाला आहे.
Russian MP death Odisha:रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे कट्टर टीकाकार आणि खासदार पावेल अँटोनोव्ह यांचा ओडिशातील रायगडमध्ये संशयास्पद मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूच्या दोन दिवस आधी, त्यांच्या मित्रायाही त्याच हॉटेलमध्ये मृत्यू झाला. या मृत्यूचे गूढ अधिकच गडद होत चालले आहे. ओडिशा राज्याच्या आरोग्य विभागाच्या फॉरेन्सिक तज्ञांचे म्हणणे आहे की, अंतिम संस्कारापूर्वी पोलिसांनी पावेल यांचा व्हिसेरा जतन केला नाही. यावरुन प्रश्न उपस्थित होत आहेत, काँग्रेस नेत्यानेही प्रश्न उपस्थित केला आहे.
व्हिसेराचे नमुने नक्कीच हवे असतील, असे राज्य पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे. मात्र, तपासात केवळ शवविच्छेदन आणि व्हिसेरा अहवालांवर अवलंबून राहण्यासारख्या गोष्टी नाहीत. अनैसर्गिक मृत्यूचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. ओडिशा सरकारने या घटनांचा तपास दक्षिण ओडिशातील रायगडा शहरातील गुन्हे शाखेकडे सोपवला होता.
नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर बातमी- पुतिनला 'दहशतवादी' म्हणणाऱ्या खासदाराचा भारतात संशयास्पद मृत्यू; हत्या की आत्महत्या..?
दरम्यान, रायगडचे मुख्य सार्वजनिक आरोग्य अधिकारी लालमोहन राउत्रे यांनी सांगितले की, पावेल यांचा मित्र बिदेनोव्हच्या व्हिसेराचे नमुने प्रयोगशाळेत चाचणीसाठी जतन करण्यात आले होते. व्हिसेरामध्ये यकृत, हृदय, प्लीहा, फुफ्फुस आणि मूत्रपिंडाचे नमुने समाविष्ट आहेत. पण, अँटोनोव्हच्या व्हिसेराचे नमुने पाठवण्यास सांगितले नव्हते.
Russian Oligarch ..War Critic..Off beat hotel..Convenient window..Fall…Death..Colleague died 2 days earlier..same hotel ….Both cremated in India..being Christians not buried..Bodies not sent home to Russia
— Manish Tewari (@ManishTewari) December 28, 2022
IF THIS IS NOT UNNATURAL THEN I DID NOT GO TO LAW SCHOOL@Naveen_Odishapic.twitter.com/A81KYGA8aG
ओडिशा पोलिसांवर प्रश्न उपस्थित
या प्रकरणात स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर न पाळल्याबद्दल माजी पोलिस आणि कायदेतज्ज्ञ पोलिसांवर सवाल उपस्थित करत आहेत. ओडिशाचे माजी डीजीपी बिपिन बिहारी मिश्रा म्हणाले की, पुढील तपासासाठी व्हिसेरा ठेवायला हवा होता. काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनीही रशियन खासदाराच्या अंत्यविधीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ''दोन ख्रिश्चनांचा हिंदू पद्धतीने अंत्यविधी. का? जळालेले मृतदेह काही बोलत नाहीत,'' असे ट्विट त्यांनी केले.