'लवकरच PoK भारतात येणार', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे सूचक वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 05:32 PM2024-05-16T17:32:21+5:302024-05-16T17:33:05+5:30
S jaishankar on PoK : 'जम्मू आणि काश्मीरमधील विकास पाहून पीओकेचे लोक भारताकडे आकर्षित झाले आहेत.'
S Jaishankar on PoK : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यानंतर आता परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही पाकव्याप्त काश्मीर(POK)बाबत मोठे वक्तव्य केले आहे. 'पाकव्याप्त काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे आणि अखेरीस तो भारतात परत येईल. तेथील जनता आता त्यांच्याच सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरली आहे, असे जयशंकर म्हणाले.
पीओकेतील जनता काश्मीरचा विकास पाहत आहे
नाशिकमध्ये आयोजित कार्यक्रमात पीओकेमधील वाढत्या हिंसाचाराबाबत बोलताना जयशंकर म्हणाले की, जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर होत असलेला विकास पाहून पीओकेचे लोक भारताकडे आकर्षित झाले आहेत. ते इकडचा सकारात्मक बदल पाहून स्वतःला प्रश्न विचारत आहेत की, या गोष्टी खऱ्या आहेत, तर आम्हाला इकडे इतका त्रास का होत आहे? आम्ही असा अत्याचार का स्वीकारत आहोत?
Pleased to share thoughts in Nashik on the topic: Vishwabandhu Bharat. Thank Shwas Foundation for hosting it.
— Dr. S. Jaishankar (Modi Ka Parivar) (@DrSJaishankar) May 16, 2024
Vishwabandhu Bharat is a coming together of Vasudhaiva Kutumbakam and Bharat First policies in equal measure.
A decade of transformation under the Modi Sarkar has… pic.twitter.com/288NmHYsNr
लोक हिंसाचाराला कंटाळले आहेत
परराष्ट्र मंत्री पुढे म्हणाले की, पीओकेच्या मुझफ्फराबादमध्ये संपूर्ण अराजकता पसरली आहे, स्थानिक लोक हिंसाचाराला कंटाळले आहेत. वाढती महागाई आणि वाढलेल्या वीजबिलामुळे अनेक दिवसांपासून परिसर अशांत आहे. पीओके एक वेगळी श्रेणी असली तरी, तो शेवटी भारताचा भाग आहे आणि भारतात परत येईल, याबद्दल आमच्या मनात शंका नाही, असेही ते यावेळी म्हणाले.