“भारतासाठी अफगाणिस्तानशी असलेली मैत्री महत्त्वाची”; एस. जयशंकर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 04:32 PM2021-08-26T16:32:22+5:302021-08-26T16:38:24+5:30
तालिबानने ताबा मिळवल्यानंतर अफगाणिस्तानमधील परिस्थितीबाबत केंद्र सरकारच्या वतीने एका सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
नवी दिल्ली:तालिबाननेअफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर आता जगभरात यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. काही राष्ट्रांनी तालिबानला काही प्रमाणात पाठिंबा दर्शवला असला, तरी अनेक राष्ट्रे सध्या नेमके काय घडत आहे, त्यावर लक्ष ठेवून आहे. भारतानेही सध्या वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. तालिबानने ताबा मिळवल्यानंतर अफगाणिस्तानमधील परिस्थितीबाबत केंद्र सरकारच्या वतीने एका सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी उपस्थित नेत्यांना याबाबत माहिती दिली. (s jaishankar says we briefed the leaders of all political parties on the afghanistan situation)
“नवी दिल्ली रेल्वे स्टेशन, मुंबई-पुणे हायवेची विक्री कोणी केली, याचा आधी जबाब द्या”
आम्ही ऑपरेशन ‘देवी शक्ती’ अंतर्गत ६ उड्डाणे केली आहेत. आम्ही बहुतेक भारतीयांना परत आणले आहे पण सर्वांना नाही. कारण त्यांच्यापैकी काही जण उड्डाणाच्या वेळी येऊ शकले नाहीत. आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि सर्वांना बाहेर काढू. आम्ही यावेळी काही अफगाण नागरिकांनाही बाहेर काढले आहे, अशी माहिती एस. जयशंकर यांनी दिली. तसेच अफगाणिस्तान प्रकरणी सरकारसह सर्व राजकीय पक्षांचा समान दृष्टिकोन आहे. त्याचप्रमाणे, अफगाण लोकांशी असलेली मैत्री देखील आपल्यासाठी महत्त्वाची आहे, असेही यावेळी नमूद केले.
“पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवणे हा काँग्रेसचाच प्रोपगंडा”: प्रज्ञा सिंह ठाकूर
सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत
सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना अफगाणिस्तानच्या परिस्थितीबाबत माहिती दिली आहे. आमचं पूर्ण लक्ष लोकांच्या सुरक्षित स्थलांतरावर आहे. आम्ही लोकांना बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, असे एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले. भारत तालिबानसह सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी मागे हटणार नाही. देशहितावर प्राधान्य दिले जाईल. मागील १० दिवसांचा घटनाक्रम पाहिला तर त्यात वेगाने घडामोडी बदलत आहेत. भारताने अद्याप तटस्थ भूमिका घेतली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जगातील ताकदवान देश स्पष्ट शब्दात तालिबानला आंतरराष्ट्रीय मार्गदर्शकानुसार शासन चालवणार असेल तर मान्यता देईल तेव्हाच सौम्य भूमिका घेतली जाईल. मानवाधिकार अंतर्गत महिलांचा अधिकारावर तालिबान त्यांच्या जुन्या भूमिकेत बदल करेल आणि सुधारणा करेल, असे सूत्रांकडून सांगितले जात आहे.
We briefed the Floor Leaders of all political parties today on the Afghanistan situation today. Our focus is on evacuation and the government is doing everything to evacuate people: EAM Dr. S Jaishankar pic.twitter.com/21GUrca33L
— ANI (@ANI) August 26, 2021
दरम्यान, तिन्ही संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत म्हणाले की, तालिबान २० वर्षात बदलला नाही केवळ त्याचे सहकारी बदललेत. तालिबान हा २० वर्षापूर्वीचा आहे. अफगाणिस्तानात होणाऱ्या दहशतवादी हालचाली भारतासाठी चिंतेच्या आहेत. अशा आव्हानाचा सामना करण्यासाठी आपत्कालीन योजना तयार करण्यात आली आहे. अफगाणिस्तानात ज्या वेगाने बदल घडला त्यामुळे आम्ही आश्चर्यचकीत आहोत. त्यामुळे आम्ही देखील इमरजेन्सी योजना आखल्या आहेत. त्यासाठी तयार आहोत असे जनरल रावत यांनी सांगितले आहे.