LAC वरून केव्हा हटणार चिनी आरमी? जयशंकर म्हणाले, 75% वाद मिटले, पण 'हा' एक मुद्दा अद्यापही कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 08:25 PM2024-09-12T20:25:47+5:302024-09-12T20:27:08+5:30

जयशंकर म्हणाले, जून 2020 मध्ये गलवान व्हॅलीमध्ये जो संघर्ष झाला, त्याचा परिणाम आमच्या संबंधांवर झाला आहे. सीमेवर कुणालाही हिंसाचाराची परवानगी दिली जाऊ शकत नाही.

s jaishankar statement on india china talks on eastern ladakh said, 75% of the disputes have been resolved | LAC वरून केव्हा हटणार चिनी आरमी? जयशंकर म्हणाले, 75% वाद मिटले, पण 'हा' एक मुद्दा अद्यापही कायम

LAC वरून केव्हा हटणार चिनी आरमी? जयशंकर म्हणाले, 75% वाद मिटले, पण 'हा' एक मुद्दा अद्यापही कायम

केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पूर्व लडाखमध्येचीनसोबत सुरू असलेल्या तणावासंदर्भात भाष्य केले आहे. 75% वाद मिटला आहे. मात्र, सीमेवर जमलेले चिनी सैनिक हा अद्यापही एक मोठा मुद्दा आहे, असे त्यांनी म्हटले आहे. स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे एका थिंक टँकशी चर्चा करताना ते बोलत होते. 

जयशंकर म्हणाले, जून 2020 मध्ये गलवान व्हॅलीमध्ये जो संघर्ष झाला, त्याचा परिणाम आमच्या संबंधांवर झाला आहे. सीमेवर कुणालाही हिंसाचाराची परवानगी दिली जाऊ शकत नाही. चीन जेव्हा आपले सैन्य मागे घेईल तेव्हाच संबंध सामान्य होऊ शकतात, ही एकमेव अट आहे.

जयशंकर म्हणाले, वाद सोडवण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान चर्चा सुरू आहे. यात काही प्रमाणात प्रगती झाली आहे. सुमारे 75 टक्के वादांवर उपाय शोधण्यात आले आहेत. दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने आहेत. याला कसे सामोरे जायचे आणि हा प्रश्न कसा सोडवायचा यावर दोन्ही देश चर्चा करत आहेत. एवढेच नाही, तर वाद संपुष्टात आल्यास चीन सोबतचे संबंध पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे होऊ शकतात. वादावर तोडगा निघाला तर शांतता आणि सौहार्द परत येऊ शकते, असेही जयशंकर यांनी म्हटले आहे. 

असे असेल पहिले पाऊल - 
जयशंकर म्हणाले, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) आजही चीनने सैन्य मोठ्या प्रमाणावर तैनात आहे. प्रत्युत्तरात आम्हीही आमच्या सैनिकांना वर पाठवले आहे. जेव्हा आम्ही कोरोनाचा सामना करत होतो, लॉकडाऊनमध्ये हतो, तेव्हा चीनने हे कृत्य केले आहे. हा अत्यंत धोकादायक प्लॅन होता. कारण एवढ्या उंचावर थंडीमध्ये सैनिकांची तैनाती केल्यास दुर्घटना होऊ शकतात आणि जून 2022 मध्ये हेच घडले. गलवानमध्ये सैनिकांमध्ये संघर्ष झाला. आमचा मुद्दा हा आहे की, चीनने असे कृत्य का केले. आपले सैनिक सीमेवर का पाठवले. आम्ही गेल्या चार वर्षांपासून चर्चा करत आहोत. मात्र आजही, परिस्थिती सामान्य होण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल असेल.

चीनला स्पष्ट संदेश -
चीनला स्पष्ट संदेस देत जयशंकर म्हणाले, चीनला सैनिक मागे घ्यावेच लागतील. त्यांना पुन्हा एकदा आपल्या ठ‍िकानांवर पोहोचावेच लागेल. तेव्हाच आमचे जवानही त्यांच्या निर्धारित ठिकाणावर परततील. यानंतरच संबंध सामान्य होऊ शकतात. तसेच, सीमेवरील गस्तीसंदर्भातही दोन्ही देशांचा करार आहे. चीनला याचे पालन करावे लागेल, असेही जयशंकर यांनी म्हटले आहे.

Web Title: s jaishankar statement on india china talks on eastern ladakh said, 75% of the disputes have been resolved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.