एस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 02:43 AM2020-08-16T02:43:09+5:302020-08-16T06:37:17+5:30
कोरोनाची लागण झाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे अशी माहिती शनिवारी एमजीएम रुग्णालयाने काढलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये दिली आहे.
चेन्नई : प्रसिद्ध ज्येष्ठ पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम (७४) यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे अशी माहिती शनिवारी एमजीएम रुग्णालयाने काढलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये दिली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असल्याचे रुग्णालयाने सांगितले.
कोरोना झाल्याने त्यांना ५ आॅगस्ट रोजी रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल झाल्यावर त्यांनी एक व्हीडिओ व्हायरल केला. कोरोनाची सौम्य लक्षणे दिसल्याने डॉक्टरांनी मला घरीच अलगीकरणाचा सल्ला दिला होता. मात्र मला कुटुंबाची काळजी वाटत असल्याने रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला असे त्यांनी व्हीडिओमध्ये नमूद केले आहे.