कधीच सुधरू शकत नाही पाकिस्तान, कोरोनासंदर्भातील सार्क देशांच्या बैठकीत उचलला काश्मीरचा मुद्दा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 09:22 AM2020-03-16T09:22:04+5:302020-03-16T10:48:14+5:30
महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाचे 32 रुग्ण आढळून आले आहेत. ही संख्या देशातील इतर राज्यांच्या तुलनेत अधिक आहेत. यासंदर्भात एआयआयएमएसने (अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था) 9971876591 हा 24/7 हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे.
नवी दिल्ली - भारतात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता 107 वर पोहोचली आहे. यात 10 पेक्षा अधिक नागरिक परदेशी आहेत. कोरोना व्हायरसमुळे जगभरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात सार्क देशांच्या झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा उचलला. यावेळी पाकिस्तानच्या आरोग्य मंत्र्यांनी, कोरोनाशी लढा देण्यासाठी काश्मीरवरील बंधने दूर करणे आवश्यक आहे.
एआयआयएमएसने सुरू केला हेल्पलाईन नंबर -
महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाचे 32 रुग्ण आढळून आले आहेत. ही संख्या देशातील इतर राज्यांच्या तुलनेत अधिक आहेत. यासंदर्भात एआयआयएमएसने (अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था) 9971876591 हा 24/7 हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे.
कोरोनाग्रस्तांची राज्यवार अकडेवारी अशी -
केरळमध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 22 वर पोहोचली आहे. याशिवाय उत्तर प्रदेशात 13, दिल्लीत 7, कर्नाटकात 6, तेलंगानामध्ये 3, लद्दाखमध्ये 3, राजस्थानमध्ये 2, जम्मू काश्मीरमध्ये 2, तामिळनाडू, पंजाब आणि आंध्र प्रदेशात प्रत्येकी 1 कोरोना बाधित रुग्ण आढूळन आले आहेत. तर कोरोनाचा संसर्ग झालेल्या 17 परदेशी नागरिकांपैकी 14 जणांना हरियाणा, 2 जणांना राजस्थान आणि एकाला उत्तर प्रदेशात ठेवण्यात आले आहे.
देशभरात रविवारी 14 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. यात महाराष्ट्रात 12, तेलंगानत 2, दिल्लीत 1 आणि कर्नाटकातही 1 रुग्ण सापडला. कोरोनामुळे भारतात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाची माहिती दडविल्याने देशात पहिला गुन्हा दाखल
कोरोनाची लागण झाल्याची माहिती दडविणे व प्रतिबंधक उपाय योजण्यात सरकारला सहकार्य न देणे याबद्दल देशातील पहिला फौजदारी गुन्हा रविवारी आग्रा पोलिसांनी नोंदविला.
आग्रा येथे माहेरी आलेल्या एका २५ वर्षीच्या नवविवाहितेच्या वडिलांविरुद्ध हा गुन्हा नोंदविण्यात आला. ही महिला बंगळुरुमध्ये नोकरी करणाऱ्या गूगल कंपनीच्या एका कर्मचा-याची पत्नी असून हे दाम्पत्य मधूचंद्रानंतर अलीकडेच इटलीहून भारतात परतले होते. इटलीखेरीज हे दाम्पत्य ग्रीस व फ्रान्सलाही गेले होते.