प्रेमभंगामुळे सबजार अहमदने निवडला दहशतवादाचा मार्ग

By admin | Published: May 27, 2017 09:09 PM2017-05-27T21:09:56+5:302017-05-27T21:09:56+5:30

लष्कराच्या कारवाईत मारला गेलेला हिजबूल मुजाहिदीनचा टॉपचा कमांडर सबजार अहमद भट्ट दहशतवादी होण्यामागची कहाणी तितकीच रंजक आहे

Sabhar Ahmed chose the path of terrorism because of love | प्रेमभंगामुळे सबजार अहमदने निवडला दहशतवादाचा मार्ग

प्रेमभंगामुळे सबजार अहमदने निवडला दहशतवादाचा मार्ग

Next
>ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 27 - लष्कराच्या कारवाईत मारला गेलेला हिजबूल मुजाहिदीनचा टॉपचा कमांडर सबजार अहमद भट्ट दहशतवादी होण्यामागची कहाणी तितकीच रंजक आहे. प्रेयसीने लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर सबजार अहमद भट्टने दहशतवादाचा मार्ग निवडला होता. पुलवामातल्या त्रालमध्ये एका इमारतीत सबजार लपल्याची माहिती मिळताच राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांना कारवाई करत त्याचा खात्मा केला.
 
(काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई, 24 तासात 10 दहशतवादी केले ठार)
(काश्मीर खो-यात वानीची जागा घेणारा सबजार अहमद ठार)
 
रथसुना गावचा रहिवासी असलेला सबजार हिजबूल मुजाहिदीनचा दहशतवादी बुरहान वानीचा खास मित्र होता अशी माहिती आहे. सबजारने एका पोलीस कर्मचा-याकडून रायफल खेचून पळवली होती. त्यानंतर 2015 रोजी त्याला हिजबूल मुजाहिदीनने दहशतवादी संघटनेत सामील करु घेतले. बुरहान वानीचा भाऊ खालीदची जवानांकडून हत्या करण्यात आल्यानंतर तो संघटनेत सामील झाला. 
 
(सबजार अहमद ठार झाल्यानंतर काश्मीरमध्ये 50 ठिकाणी दगडफेक)
(बारा तासांच्या आत काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा पुन्हा बंद)
 
झाकीर उर्फ मुसाने हुर्रियत नेत्यांविरोधात वक्तव्य करत संघटनेतून माघार घेतल्यानंतर सबजारला कमांडर म्हणून निवडण्यात आलं होतं अशी माहिती पोलीस सुत्रांकडून मिळाली आहे. त्रालच्या जंगलात त्याला प्रशिक्षण देण्यात आलं. मात्र त्याला कधीच पाकिस्तानात पाठवण्यात आलं नव्हतं. 
 
डिसेंबर 2015 मध्ये पोलिसांनी काही दहशतवाद्यांवर इनाम घोषित केलं होतं, त्यामध्ये सबजारचाही समावेश होता. सबजार हा बुरहान वानीचा उजवा हात होता. त्याच्यासोबत फोटो काढणे, व्हिडिओ शूट करणे आणि त्याद्वारे सहानुभूती मिळवणे, अशी त्याची मोडस ओपरेंडी होती.
 
अतिरेकी कारवायांमागचा मेंदू अशी सबजारची ओळख आहे. मार्च महिन्यातच त्रालमध्ये सबजार जाळ्यात अडकला होता, पण दगडफेक करणाऱ्या नागरिकांची ढाल करुन निसटला होता.  भारतीय लष्कराला माहिती पुरवणाऱ्या नागरिकांची तो हत्या करायचा. साब डॉन या नावानं तो हिजबूलमध्ये ओळखला जायचा. सबजारच्या डोक्यावर 10 लाखांचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं.
 
बुरहान वानीच्या खात्म्यानंतर त्याला हिरो करण्याचा प्रयत्न कट्टरवाद्यांनी केला. त्यासाठी सोशल मीडियाचं प्रभावी अस्त्र वापरलं. त्यामुळे उसळलेल्या दंगलीत 100 जणांचा मृत्यू झाला. आणि 12 हजार लोक जखमी झाले. पण त्यानंतर काश्मीर खोऱ्यात सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली. पण तीच बंदी आज योगायोगाने उठवण्यात आली आहे.
 
गेल्या 24 तासात सर्च ऑपरेशदरम्यान भारतीय लष्कराने कारवाई करत 10 दहशतवाद्यांना ठार केलं आहे. लष्कराने स्वत: ही माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या सर्व दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि स्फोटकांचा साठा होता. 
पाकिस्तान आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी रमजानच्या पवित्र महिन्यात जम्मू काश्मीरात दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न करत असून जवानांनी तो हाणून पाडला आहे असं लष्कराकडून सांगण्यात आलं आहे. सबजार अहमदला ठार करण्याआधी शुक्रवारी रात्री जम्मू काश्मीरात पुलवामा येथे दहशतवाद्यांनी जवानांच्या एका पथकावर हल्ला केला होता. लष्कराने प्रत्युत्तर देत सर्च ऑपरेशनदरम्यान तीन दहशतवाद्यांना ठार केलं. 

Web Title: Sabhar Ahmed chose the path of terrorism because of love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.