"सीमाही माझी आणि 4 मुलंही माझी..."; सचिनचं पाकिस्तानच्या गुलाम हैदरला रोखठोक उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 11:33 AM2023-08-28T11:33:03+5:302023-08-28T11:33:26+5:30
Seema Haider : सचिनने सीमा आणि मुलांना कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानात पाठवणार नसल्याचं सांगितले.
आपल्या प्रियकरासाठी पाकिस्तानातूनभारतात आलेली सीमा विविध कारणांमुळे चर्चेत आहे. तिच्याबाबत रोज नवनवीन माहिती समोर येत असते. पाकिस्तानी सीमा हैदरचा पती गुलाम हैदरने काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की, तो मुलांना परत घेऊन येण्यासाठी भारतात येणार आहेत. यावर आता सीमाचा प्रियकर सचिन मीणाने रोखठोक उत्तर दिलं आहे. सचिनने सीमा आणि मुलांना कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानात पाठवणार नसल्याचं सांगितले.
सचिन यासाठी कायदेशीर लढाई लढणार आहे. सचिन म्हणाला की, सीमा माझी आहे आणि चारही मुलंही आता माझी आहेत. जेव्हा सीमाला गुलामकडे परत जायचं नाही तेव्हा तो हे सर्व का करत आहे? असा सवालही विचारला आहे. गुलाम म्हणाला होता की, सीमा सचिनकडेच राहू दे किंवा नको राहून तसेच भारत सरकार तिला कोणतीही शिक्षा देऊदे किंवा नको देऊदे. मात्र चारही मुलं निर्दोष आहेत. त्यांना परत घेण्यासाठी भारतात येणार आहे.
व्हिसा मिळण्यामध्ये काही समस्या आहे. व्हिसाची समस्या दूर होताच तो लगेचच भारतात येईल. शिवाय त्याने एक वकील देखील नेमला आहे. तो कोणत्याही परिस्थितीत सीमाला सोडणार नाही. तिला शिक्षा भोगावी लागेल. मुलं जेव्हा सचिनला वडील म्हणतात तेव्हा त्याला खूप वाईट वाटतं. गुलामने सौदीतून एक व्हिडिओ जारी केला आणि म्हटलं की मुले निर्दोष आहेत आणि त्यांना जे सांगितलं जातं ते मुलं करतात आणि बोलतात.
सीमाने सांगितलं की, तिची मुले गुलामला नाही तर सचिनला आपले वडील मानतात. सचिनचेही त्याच्यावर प्रेम आहे. मुलं गुलामला ओळखणार नाहीत. यावर गुलाम म्हणाला की, मुलांमध्ये त्याचं रक्त आहे. तो मुलांशी फोनवरही बोलायचा. मग मुलं का ओळखणार नाहीत? तो मुलांना त्याच्याकडे परत आणणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.