सचिन म्हणतो, पत्नी, मुलीला संपवून मलाही मरायचे होते माय-लेक हत्या प्रकरण : कोठडीतच आत्महत्या करण्याची धमकी
By admin | Published: May 17, 2016 09:15 PM2016-05-17T21:15:30+5:302016-05-17T21:15:30+5:30
जळगाव : मायलेकीच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन गुमानसिंग जाधव याच्याकडून हत्येचे कारण उकलण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. पत्नी व मुलीला संपवून मलाही मरायचे होते, इतकेच तो सांगत आहे. हत्या कशासाठी केली, त्यांना कोणापासून त्रास होता का? याबाबतही तो काहीच सांगत नाही. दरम्यान, पोलिसांना शिवीगाळ करून तो कोठडीतच आत्महत्या करण्याची धमकी देत आहे. त्यामुळे पोलीसही हतबल झाले आहेत.
Next
ज गाव : मायलेकीच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन गुमानसिंग जाधव याच्याकडून हत्येचे कारण उकलण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. पत्नी व मुलीला संपवून मलाही मरायचे होते, इतकेच तो सांगत आहे. हत्या कशासाठी केली, त्यांना कोणापासून त्रास होता का? याबाबतही तो काहीच सांगत नाही. दरम्यान, पोलिसांना शिवीगाळ करून तो कोठडीतच आत्महत्या करण्याची धमकी देत आहे. त्यामुळे पोलीसही हतबल झाले आहेत. रिंगरोडवरील डॉ.राजेंद्र सरोदे यांच्या राजस हॉस्पिटलमध्ये सचिन जाधव (वय ४० मुळ गाव मोयगाव ता.जामनेर) याने पत्नी कविता (वय ३५) व मोठी मुलगी रिया (वय १५) या दोघांची पाच मे रोजी हत्या केली होती. त्यानंतर सचिन हा फरार झाला होता. त्यानंतर पाच दिवसांनी तो पोलिसांना शरण आला होता.या गुन्ात सचिनसह त्याचा भाऊ, भावजयी, आई व वडील यांना अटक करण्यात आली आहे. त्याच्या परिवारातील आई व भावजयी यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केलेला आहे, मात्र अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. या हत्याकांडाबाबत सचिनच्या चेहर्यावर पातापाचे कोणतेही भाव दिसून येत नाही.तपासात अजिबात सहकार्य नाही...कोठडीत असताना सचिन हा तपासात अजिबात सहकार्य करीत नाही, उलट उपस्थित कर्मचार्यांनाच शिवीगाळ करून कोठडीतच आत्महत्या करण्याची धमकी देत आहे, त्याच्या अशा वागण्यामुळे कर्मचारीही वैतागले आहेत. कोठडीत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्याकडे बघून तो संताप व्यक्त करत असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.