सचिन तेंडुलकरने रिओ ऑलिम्पकसाठी 'गुडविल अॅम्बेसेडर'चा प्रस्ताव स्वीकारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2016 03:02 PM2016-05-03T15:02:55+5:302016-05-03T16:32:19+5:30
माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी सदिच्छा दूत बनण्याचा भारतीय ऑलिम्पिक संघटनेचा प्रस्ताव स्वीकारला असल्याचे भारतीय ऑलिम्पिक संघटनेने आज स्पष्ट केले
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ : माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी सदिच्छा दूत बनण्याचा भारतीय ऑलिम्पिक संघटनेचा प्रस्ताव स्वीकारला असल्याचे भारतीय ऑलिम्पिक संघटनेने आज स्पष्ट केले. अभिनेता सलमान खान आणि अभिनव बिंद्रानंतर मास्टर ब्लास्टर सचिन रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी गुडविल अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त होणार आहे.
अभिनेता सलमान खानला रिओ ऑलिम्पिकचा सदिच्छादूत केल्यापासून वाद निर्माण झाला होता. चित्रपटसृष्टीतील काही कलाकार आणि क्रिडापटू सलमान खानच्या नियुक्तीला समर्थन केले होते तर दुसरीकडे योगेश्वर दत्त, मिल्खा सिंग यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत टीका केली होती.
राष्ट्रीय ऑलिम्पिक संस्थेनं २९ एप्रिल रोजी तेंडुलकरला सदिच्छा दूत बनण्याची विनंती केली होती. सचिन तेंडुलकर सारख्या प्रसिद्ध खेळाडूंनी रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी सदिच्छा दूत बनण्याचा प्रस्ताव स्विकाराला याचा आम्हाला आनंद आहे. आम्ही त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो असे ऑलिम्पिक संघटनेनेचे सरचिटणीस राजीव मेहता म्हणाले.