गैरहजेरीच्या मुद्दानंतर सचिन तेंडुलकरची राज्यसभेत हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2017 02:11 PM2017-08-03T14:11:00+5:302017-08-03T14:14:43+5:30

राज्यसभा खासदार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या संसदेतील गैरहजरेची मुद्दा दोन दिवसांपूर्वी उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर आज सचिन तेंडुलकरने राज्यसभेच्या सभागृहात हजेरी लावली. 

Sachin Tendulkar's absence from Rajya Sabha after absence | गैरहजेरीच्या मुद्दानंतर सचिन तेंडुलकरची राज्यसभेत हजेरी

गैरहजेरीच्या मुद्दानंतर सचिन तेंडुलकरची राज्यसभेत हजेरी

नवी दिल्ली, दि. 3 - राज्यसभा खासदार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या संसदेतील गैरहजरेची मुद्दा दोन दिवसांपूर्वी उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर आज सचिन तेंडुलकरने राज्यसभेच्या सभागृहात हजेरी लावली. 

दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 1 ऑगस्टला समाजवादी पार्टीचे खासदार नरेश अग्रवाल यांनी सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री रेखा यांच्या राज्यसभेतील गैरहजेरीचा मुद्दा उपस्थित केला होता. यावेळी समाजवादी पार्टीचे नरेश अग्रवाल यांनी सचिन तेंडुलकर आणि रेखा यांना संसदेच्या सभागृहात यायचे नसेल, तर ते आपल्या खासदारकीचा राजीनामा का देत नाही, असा सवाल केला होता.  याचबरोबर बँकांचे हजारो कोटींचे कर्ज बुडवून परदेशात जाऊन बसलेल्या विजय माल्ल्याची जशी राज्यसभा खासदारकी रद्द करण्यात आली. त्याचप्रमाणे सचिन तेंडुलकर आणि रेखा यांना सुद्धा बाहेरचा रस्ता दाखविण्यात यावा, असेही नरेश अग्रवाल यांनी म्हटले होते. दरम्यान, आज सचिन तेंडुलकर राज्यसभेच्या सत्रात सहभाग घेतला. मात्र, यावेळी सचिन तेंडुलकरने एकही प्रश्न विचारला नाही. सचिन तेंडुलकरसोबत  बॉक्सिंगपटू एससी मेरी कोम सुद्धा यावेळी सभागृहात उपस्थित होती.

या आधीही बराचदा सचिन तेंडुलकर आणि रेखा यांच्या गैरहजेरीचा मुद्दा राज्यसभेत उपस्थित करण्यात आला होता. सचिन तेंडुलकरला 2012 मध्ये राज्यसभेचे खासदार म्हणून संसदेत पाठविण्यात आले होते. त्यानंतर सचिन तेंडुलकरने एप्रिल 2017 पर्यंत म्हणजे 348 दिवसांत फक्त 23 वेळा राज्यसभेत हजरी लावली आहे. तर, अभिनेत्री  रेखा यांना सुद्धा 2012 मध्येच खासदार म्हणून पाठविण्यात आले होते. त्यांची एप्रिल 2017 पर्यंत उपस्थिती फक्त 18 दिवसांची आहे. तसेच, त्या दोघांच्या खासदारकीचा कार्यकाळ हा 26 एप्रिल 2018 पर्यंत आहे. 

कला, साहित्य, विज्ञान, सामाजिक शास्त्र अशा विविध क्षेत्रातील 12 मान्यवरांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात येते. यामध्ये सचिन तेंडुलकर, रेखा यांच्याशिवाय अनु आगा, संभाजी छत्रपती, स्वपन दासगुप्ता, रुपा गांगुली, नरेंद्र जाधव, एमसी मेरी कोम, के पारासरन, गोपी सुरेश, सुब्रह्मण्यम स्वामी आणि केटीएस तुलसी यांचा समावेश आहे.


Web Title: Sachin Tendulkar's absence from Rajya Sabha after absence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.