भारताच्या जेम्स बॉण्डला हटवण्यासाठी #SackDoval ट्रेंड
By admin | Published: April 25, 2017 11:10 AM2017-04-25T11:10:46+5:302017-04-25T11:10:46+5:30
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 25 जवान शहीद झाल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
रायपूर, दि. 25 - छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 25 जवान शहीद झाल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. अपेक्षेप्रमाणे सोशल मीडियावर देखील या घटनेचे पडसाद उमटले असून, टि्वटरयुझर्समध्ये भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावरुन युद्ध रंगले आहे. या घटनेसाठी काही टि्वटर युझर्सनी अजित डोवाल यांना जबाबदार धरले आहे.
नक्षलवादी हल्ला हा अजित डोवाल यांच्या फसलेल्या रणनितीचे फलित आहे त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी काही टि्वटर युझर्सनी केली आहेत तर, दुस-या बाजूला अशी मागणी करणा-यांना राष्ट्रविरोधी ठरवण्यात येत आहे. ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्यावेळी सुवर्णमंदिरा तसेच पाकिस्तानात जाऊन केलेली हेरगिरी हे डोवाल यांचे योगदान विसरलात का ? असे डोवाल समर्थकांचे म्हणणे आहे. टि्वटरवर #SackDoval हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आहे. भारताने सप्टेंबर महिन्यात पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर अजित डोवाल यांना भारताचे जेम्स बाॅण्ड म्हटले गेले होते.
This trend #SackDoval is a deliberate attempt of anti India forces. They r taking advantage of Sukma tragedy fr their personal gains. Shame
— Niraj shaha (@nirajshh) April 25, 2017
सोमवारी दुपारी सुकमा जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागातील रस्ते कामाच्या गस्तीवर असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर ३०० नक्षलवाद्यांनी हल्ला केला. यात कमांडर रघुवीर सिंह यांच्यासह २५ जवान शहीद झाले असून, सहा जवान अत्यवस्थ आहेत.
सुकमाच्या चिंतागुफा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुरकापालपासून दीड किलोमीटर दूर दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी दुपारी १२.१५ वाजता गस्तीवर असलेल्या पोलीस दलावर गोळीबाार केला. सुरक्षा पथकानेही तत्क्षणीच पलटवार करीत गोळीबार केल्याने, दोन्ही बाजूने गोळीबाराची धुमश्चक्री उडाली. नक्षलवाद्यांनी या वर्षी केलेला हा अत्यंत भीषण हल्ला आहे.
#SackDoval bcoz he is responsible for un rest in south asia. Solve kashmir issue as per UN resolutions. Talk with Pakistan, Kashmiris Naxals
— AfzalAhmed (@afzkpmg) April 25, 2017