India China FaceOff: 20 दिवसांपूर्वीच 'बाप' बनलेल्या कुंदनला वीरमरण, भारतमातेसाठी दिलं बलिदान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 12:25 PM2020-06-17T12:25:10+5:302020-06-17T12:26:40+5:30

कुंदन ओझा यांचे कुटुंब गेल्या ३० वर्षांपासून झारखंड राज्यातील साहेबगज येथे राहत आहे. मंगळवारी रात्री कुंदन यांच्या वीरमरणाचे वृत्त समजताच गावासह कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

Sacrifice of Kundan ojha, who became 'Baap' 20 days ago, for the protection of Bharamata | India China FaceOff: 20 दिवसांपूर्वीच 'बाप' बनलेल्या कुंदनला वीरमरण, भारतमातेसाठी दिलं बलिदान

India China FaceOff: 20 दिवसांपूर्वीच 'बाप' बनलेल्या कुंदनला वीरमरण, भारतमातेसाठी दिलं बलिदान

Next

मुंबई – भारत आणि चीनी सैनिकांमध्ये 15 आणि 16 जून रोजी गलवान खोऱ्यात संघर्ष झाला.  भारतीय सीमेवरील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांनी हल्ल्यात भारताच्या एका कर्नलसह तीन जवान शहीद झाले. याच हल्ल्यात भारताचे आणखी 17 जवान जखमी झाले होते. परंतु त्या परिसरात शून्याखाली असलेल्या तापमानामुळे ते वाचू न शकल्याने शहीदांची संख्या 20 झाली. चीनसोबतच्या या चकमकीत 28 वर्षीय कुंदन ओझा यांना वीरमरण प्राप्त झालंय. कुंदन यांच्या निधनाची बातमी समजतात त्यांच्या मूळ गावी शोककळा पसरली.

कुंदन ओझा यांचे कुटुंब गेल्या ३० वर्षांपासून झारखंड राज्यातील साहेबगज येथे राहत आहे. मंगळवारी रात्री कुंदन यांच्या वीरमरणाचे वृत्त समजताच गावासह कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. शेतकरी असलेल्या रविशंकर ओझा यांचे सुपुत्र कुंदन हे 10 वर्षापूर्वीच भारतीय सैन्यात भरती झाले होते.  तर, दोन वर्षांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. कुंदन यांच्या कुटुंबात 20 दिवसांपूर्वीच गुडन्यूज आली होती, त्यांच्या पत्नीने गोंडस मुलीला जन्म दिला होता. आपल्या घरी पहिली मुलगी झाल्याचा मोठा आनंद कुंदन यांना झाला होता. मात्र, आपल्या चिमुकल्या मुलीला जवळून पाहणं कुंदन यांच्या नशिबी नव्हत. कुंदन यांना गलवान सीमारेषेवर वीरमरण प्राप्त झाले. देशासाठी भारतमातेच्या सुपुत्राने आपले बलिदान दिले. दरम्यान, कुंदन यांचे सासरे दिल्लीत नोकरी करतात. कुंदन यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या सासरच्या कुटुंबावरही दु:खाचा डोंगर कोसळला.  

दरम्यान, देशासाठी मुलाने आपल्या प्राणाचे बलिदान दिले, मला त्याचा अभिमान आहे अशी भावना चीनच्या चकमकीत धारातीर्थी कोसळलेल्या कर्नल संतोष बाबू यांच्या आईने व्यक्त केली आहे. तसेच आपला एकुलता एक मुलगा आता कधीच परत येणार नाही या गोष्टीचं दु:ख देखील असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 'सुरुवातीला आम्हाल जेव्हा हे समजलं तेव्हा आमचा विश्वासच बसला नाही. खूप मोठा धक्का बसला. माझ्या मुलाने अनेक आव्हांनाचा सामना केला आहे' अशा भावना संतोष यांच्या पालकांनी व्यक्त केल्या आहेत. शहीद कर्नल संतोष यांची आई मंजुळा यांनी 'देशासाठी माझ्या मुलाने बलिदान दिले याचा मला अभिमान आहे पण एक आई म्हणून आज मी दु:खी आहे' असं म्हटलं आहे.
 

Web Title: Sacrifice of Kundan ojha, who became 'Baap' 20 days ago, for the protection of Bharamata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.