कार्यक्रम रद्द झाल्याने दु:खी - गुलाम अली

By admin | Published: October 8, 2015 09:22 AM2015-10-08T09:22:21+5:302015-10-08T11:52:42+5:30

मी गेल्या ४० वर्षांपासून संगीत क्षेत्रात आहे, पण यापूर्वी असे कधीच झाले नव्हते. कार्यक्रम रद्द झाल्याने मला खूप दु:ख झाल्याची प्रतिक्रिया गुलाम अली यांनी दिली.

Sad due to the cancellation of the program - slave Ali | कार्यक्रम रद्द झाल्याने दु:खी - गुलाम अली

कार्यक्रम रद्द झाल्याने दु:खी - गुलाम अली

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ८ - जगजित सिंग माझ्यासाठी भावाप्रमाणे होते, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम रद्द झाल्यामुळे मला राग आला नसली तरी खूप द:ख झाले आहे, अशी भावना ज्येष्ठ गझलगायक गुलाम अली खान यांनी व्यक्त केली आहे. एकाहून एक सरस गझला लोकप्रिय करणारे गुलाम अली हे केवळ पाकिस्तानी नागरिक असल्याच्या कारणाने शिवसेनेने त्यांच्या मुबईतील कार्यमक्रमाला विरोध केल्याने त्यांचा हा कार्यक्रमच आता रद्द करण्यात आला आहे. 
याविषयी बोलताना गुलाम अली यांनी 'हा सर्व प्रकार दुर्दैवी असल्याचे सांगत दु:ख व्यक्त केले. गेल्या ४० वर्षांपासून मी संगीत क्षेत्रात आहे, पण याआधी असे कधीच घडले नव्हते, भारतात मला प्रत्येक वेळेस प्रेमच मिळाले आहे. संगीत हे असे माध्यम आहे, ज्याद्वारे आपण फक्त प्रेमाच्या गोष्टी करतो, त्यातून सर्वांनाच प्रेम मिळते. कार्यक्रम रद्द झाल्याने चाहते निराश झाले आणि त्यामुले मीही दु:खी झालो ' अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 
गुलाम अली यांच्या गझल गायनाचा कार्यक्रम शुक्रवारी ९ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला होता. मात्र त्यास शिवसेना चित्रपट सेनेचे सरचिटणीस अक्षय बर्दापूरकर यांनी विरोध दर्शविला होता. षण्मुखानंद सभागृहाच्या व्यवस्थापनाची भेट घेऊन हा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली होती. सीमेवर पाकिस्तानकडून हल्ले केले जात असताना गुलाम अली यांचा कार्यक्रम रद्द केला नाही तर आम्ही आमच्या स्टाईलने आंदोलन करू अशा इशारा सेनेने दिला होता, त्यानंतर आायोजकांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन हा कार्यक्रम रद्द केल्याचे सांगितले. 
 

Web Title: Sad due to the cancellation of the program - slave Ali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.