दुःखद! बॅरिकेट्स तोडून कॅम्पात घुसलेल्या टँकरने घेतला २ जवानांचा जीव 

By पूनम अपराज | Published: February 2, 2021 01:22 PM2021-02-02T13:22:42+5:302021-02-02T13:24:26+5:30

Accident In UP : जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Sad! The tanker broke through the barricades and entered the camp, killing 2 soldiers | दुःखद! बॅरिकेट्स तोडून कॅम्पात घुसलेल्या टँकरने घेतला २ जवानांचा जीव 

दुःखद! बॅरिकेट्स तोडून कॅम्पात घुसलेल्या टँकरने घेतला २ जवानांचा जीव 

Next
ठळक मुद्देप्राप्त माहितीनुसार, शेतकरी आंदोलनामुळे या सैनिकांची ड्युटी महामार्गावर लावण्यात आली होती, तेथे त्यांनी तात्पुरते तंबू बसवले होते.अपघात झाल्यानंतर टँकर अनियंत्रित झाला आणि कॅम्पात घुसला. तिथे सैनिक बसले होते. नॅशनल हायवे -९१ (एनएच -९१) on) वर झालेल्या या भीषण अपघातात दोन जवानांचा मृत्यू झाला तर दोनजण जखमी झाले.

उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरमध्ये एका वेदनादायक अपघाताची माहिती समोर येत आहे. येथे एक टँकर बॅरिकेड तोडून कर्तव्यावर असलेल्या जवानांच्या अंगावर गेला. खरं तर, टँकर आणि ट्रक यांच्यात अपघात झाल्यानंतर टँकर अनियंत्रित झाला आणि कॅम्पात घुसला. तिथे सैनिक बसले होते. नॅशनल हायवे -९१ (एनएच -९१) on) वर झालेल्या या भीषण अपघातात दोन जवानांचा मृत्यू झाला तर दोनजण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.
 

 

पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला पोलीस कोठडी, हत्येचे ठोस कारण अद्याप गुलदस्त्यातच

 

प्राप्त माहितीनुसार, शेतकरी आंदोलनामुळे या सैनिकांची ड्युटी महामार्गावर लावण्यात आली होती, तेथे त्यांनी तात्पुरते तंबू बसवले होते. पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला असून दोन्ही मृत सैनिक हे गाझियाबादचे रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. त्यावेळी डझनभर सैनिक तैनात करण्यात आले होते.

पोलिस अधीक्षक म्हणाले, "बुलंदशहरच्या सिकंदराबाद भागात ट्रॅक आणि टँकर यांची एकमेकांना जोरदार टक्कर लागून भीषण अपघात झाला. त्यानंतर टँकर चालकाचा ताबा सुटला आणि कॅम्पमध्ये घुसला, त्यात दोन पीएसी जवानांचा मृत्यू झाला." उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पीएसीच्या दोन सैनिकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Read in English

Web Title: Sad! The tanker broke through the barricades and entered the camp, killing 2 soldiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.