महाराष्ट्राला क्रांतिकारकांचा विसर सदानंद मोरे यांचे प्रतिपादन
By admin | Published: November 15, 2015 11:14 PM2015-11-15T23:14:15+5:302015-11-15T23:14:15+5:30
पुणे : महाराष्ट्र महापुरुष आणि क्रांतिकारकांची आठवण करण्यात कमी पडत असून राज्याने हा कद्रूपणा सोडायला हवा. देशासाठी प्रेरणा असणार्या लोकांचा विसर पडता कामा नये. असे मत संतसाहित्याचे अभ्यासक व ८८ व्याअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
Next
प णे : महाराष्ट्र महापुरुष आणि क्रांतिकारकांची आठवण करण्यात कमी पडत असून राज्याने हा कद्रूपणा सोडायला हवा. देशासाठी प्रेरणा असणार्या लोकांचा विसर पडता कामा नये. असे मत संतसाहित्याचे अभ्यासक व ८८ व्याअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. क्रांतिकारक हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या बलिदान शताब्दीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर श्री.म.भावे, सु.ह.जोशी व इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे उपस्थित होते. मोरे पुढे म्हणाले, देशासाठी प्राण दिलेले लोक हे केवळ भूतकाळ नाही तर त्यांच्या कार्याचा गौरव होणे गरजेचे आहे. इतिहासाचे आपल्याकडे जितके चीज व्हायला हवे तितके होत नाही त्यामुळे स्वत:ला देशप्रेमी मानणार्या आणि सत्तेत असणार्या सरकारने याकडे लक्ष द्यायला हवे. क्रांतिकारक पिंगळे हे अतिशय पुरोगामी होते म्हणून इतक्या मोठ्या व्यक्तीला दूर सारणे चुकीचे असून ही चूक आपण लवकरात लवकर सुधारायला हवी. भावे म्हणाले, स्वातंत्र्यासाठी अनेक चळवळी आणि लढाया झाल्या असल्या तरीही स्वातंत्र्यलढ्याला पूरक असेच क्रांतिकारकांचे काम होते. मात्र या गोष्टीकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष होते. स्वातंत्र्याच्या प्रवाहांचा वेध घेऊन आपल्या राष्ट्रीय चारित्र्याचा अंदाज घ्यायला हवा. त्यासाठी स्वातंत्र्याचे विविध पैलू लक्षात घ्यायला हवेत. यावेळी सु.ह.जोशी यांनी हुतात्मा विष्णू पिंगळे यांच्या कार्याबाबत देताना आपल्या राज्यात क्रांतीवीरांना स्थान नसल्याबाबत खंत व्यक्त केली. पांडुरंग बलकवडे यांनी प्रास्ताविक केले.