CoronaVirus : लखनौमध्ये 12 तबलिगी आढळले पॉझिटिव्ह, सदर परिसर बनला मोठा 'हॉटस्पॉट'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 03:59 PM2020-04-15T15:59:42+5:302020-04-15T16:40:51+5:30
येथील सदर भागात मंगळवारी 31 कोरोना बाधित सापडले. आता येथील एकूण कोरोना बाधितांची संख्या 51वर पोहोचली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे देशातील कुठल्याही भागात एवढ्या मोठ्या प्रमाणावर अद्यापपर्यंत कोरोना बाधीत सापडलेले नाहीत. त्यामुळे हा भाग आता देशातील सर्वात मोठा हॉटस्पॉट बनला आहे.
लखनौ : देशातील कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. आता कोरोना व्हायरस हा उत्तर प्रदेशसाठीही चिंतेचा विषय ठरू लागला आहे. येथील सदर भागात मंगळवारी 31 कोरोना बाधित सापडले. आता येथील एकूण कोरोना बाधितांची संख्या 51वर पोहोचली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे देशातील कुठल्याही भागात एवढ्या मोठ्या प्रमाणावर अद्यापपर्यंत कोरोना बाधीत सापडलेले नाहीत. त्यामुळे हा भाग आता देशातील सर्वात मोठा हॉटस्पॉट बनला आहे.
सदर येथील अली जान मशिदीत तबलिगी जमातचे 12 लोक थांबलेले होते. पोलिसांनी येथे छापामारीकरून त्यांना पकडले. हे सर्वजण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने हा परिसर पूर्णपणे सील केला आहे.
अहवालाने सर्वांच्याच भूवया उंचावल्या -
सदर येथे तबलिगी जमातच्या संपर्कात आलेल्या लोकांचे सॅम्पलिंग घ्यायला सुरुवात केली आहे. यानंतर नव-नवे रुग्ण समोर येऊ लागले आहेत. एवढेच नाही, तर मंगळवारी आलेल्या अहवालाने तर सर्वांच्याच भूवया उंचावल्या. लखनौमध्ये एकूण 31 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. धक्कादायक गोष्ट म्हणजे हे सर्वजण सदर भागातीलच आहेत.
संक्रमितांचे जमाती लिंक
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 5 अल्पवयीन, 4 महिला आणि 22 पुरुषांचा समावेश आहे. हे सर्वजण कुठल्या ना कुठल्या पद्धतीने जमाती मंडळींच्या संपर्कात आले आहेत.