मातीचा ऱ्हास थांबवण्यासाठी सद्गुरूंनी सादर केली त्रिसूत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 06:08 AM2022-05-13T06:08:47+5:302022-05-13T06:09:02+5:30
१९५ राष्ट्रांना एक केंद्रित कृतीच्या योजनेचे केले आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : मातीसाठीच्या १०० दिवसांच्या ३०,००० किलोमीटर मोटारसायकल प्रवासावर असलेल्या सद्गुरूंनी आयव्हरी कोस्टमधील अबीद्जानला उड्डाण केले आणि संयुक्त राष्ट्रसंघ वाळवंटीकरण प्रतिबंधक परिषदेच्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीजच्या १५ व्या सत्रात १९५ राष्ट्रांच्या प्रतिनिधींना संबोधित केले. सद्गुरूंनी त्यांच्या संबोधनात एक व्यापक उद्दिष्ट सांगितले ते म्हणजे शेतजमिनीत किमान ३ ते ६% सेंद्रिय सामग्री आहे, याची खात्री करणे आणि हे साध्य करण्यासाठी त्रिसूत्री धोरण सांगितले.
सद्गुरूंनी माती वाचवा मोहिमेत जागतिक शेतजमिनीच्या ऱ्हासावर उपाययोजना सादर केली. आयव्हरी कोस्ट येथील सत्रात जमलेल्या जगातील सर्व राष्ट्रांना संबोधित करताना ते म्हणाले की, माती नामशेष होण्याच्या उंबरठ्यावरून मानवतेला परत आणण्यासाठी ही एक महत्त्वाची संधी आहे. ज्या मातीत ३ ते ६ % सेंद्रिय सामग्री आहे, अशा मातीतून पिकवलेल्या अन्नासाठी आग्रही असायला हवे. या उपक्रमाचा परिणाम म्हणून, लोक अधिक निरोगी, अधिक कार्यक्षम होऊन त्यांची रोग प्रतिकारशक्ती वाढेल. त्यामुळे हे स्पष्ट आहे की, उच्च दर्जाच्या अन्नाच्या अशा चिन्हाला तथाकथित ‘ऑरगॅनिक’ आणि ‘नॉन ऑरगॅनिक’ उत्पादनामध्ये फरक करण्याचा सध्याच्या पद्धतीपेक्षा कितीतरी अधिक अर्थ असेल. सद्गुरूंनी ट्विटरवर शेअर केले, सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मातीला सजीव म्हणून ओळखणे आणि ती जिवंत ठेवणे. पृथ्वीवरील ८५% पेक्षा जास्त राष्ट्रे अजूनही मातीकडे निर्जीव वस्तू म्हणून पाहतात. यूएनसीसीडीचे कार्यकारी सचिव इब्राहिम थियाव यांनी त्यांच्या ट्विटमध्ये माती वाचवण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेबद्दल सद्गुरूंचे आभार मानले आहेत.
चळवळीला मिळतोय प्रचंड पाठिंबा
n २१ मार्च रोजी लंडनहून सुरू झालेला त्यांचा प्रवास पुढे सुरू ठेवण्यासाठी सद्गुरू युरोप आणि मध्य आशियामधून प्रवास करत मे महिन्यात अरब राष्ट्रांत पोहोचले, जिथे माती वाचवण्याच्या चळवळीला सरकार आणि नागरिकांकडून अनेक शुभेच्छा आणि प्रचंड पाठिंबा मिळाला.
n जगातील ३.५ अब्ज लोकांचा पाठिंबा मिळवून जगभरातल्या शासनांना मातीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी धोरणात्मक बदल करण्यासाठी प्रेरित करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.