सिद्धरामेश्वरांच्या जयजयकारात आल्या पालख्या 32 गावच्या पालख्या : दुष्काळ हटवण्यासाठी पालकमंत्र्यांचे देवाला साकडे
By Admin | Published: August 31, 2015 09:43 PM2015-08-31T21:43:51+5:302015-08-31T21:43:51+5:30
सोलापूर : ‘सिद्धेश्वर महाराज की जय़़़ एकदा भक्तलिंग हर बोला़़़ हर्र’ अशा घोषणा देत 32 गावांतून ग्रामदैवताच्या मंदिरात पालख्या दाखल झाल्या़ धार्मिक विधी, पूजेनंतर या पालख्या पुन्हा गावाकडे मार्गस्थ झाल्या़ तसेच तिसर्या र्शावण सोमवारनिमित्त लाखो भक्तांनी ग्रामदैवताचे आणि योगसमाधीचे दर्शन घेतल़े
स लापूर : ‘सिद्धेश्वर महाराज की जय़़़ एकदा भक्तलिंग हर बोला़़़ हर्र’ अशा घोषणा देत 32 गावांतून ग्रामदैवताच्या मंदिरात पालख्या दाखल झाल्या़ धार्मिक विधी, पूजेनंतर या पालख्या पुन्हा गावाकडे मार्गस्थ झाल्या़ तसेच तिसर्या र्शावण सोमवारनिमित्त लाखो भक्तांनी ग्रामदैवताचे आणि योगसमाधीचे दर्शन घेतल़े अप्पावरूंच्या संकल्पनेनुसार गेल्या 9 वर्षांपासून वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांच्या ग्रामदैवतांच्या पालख्या सिद्धरामेश्वरांच्या दर्शनासाठी र्शावण मासातील तिसर्या सोमवारी येतात़ यावर्षी वैभवपूर्ण पद्धतीने 32 गावच्या पालख्या दाखल झाल्या़ रविवारी रात्री अक्कलक ोट रोडवरील वीरतपस्वी मठात या पालख्या दाखल झाल्या़ रात्री भजन आणि धार्मिक विधीचा सोहळा पार पडला़ सोमवारी पहाटे 6 वाजता पंचमुखी परमेश्वर लिंगाची पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू आणि आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते पूजा करण्यात आली़ त्यानंतर सकाळी 6़30 वाजता या पालख्या वाजतगाजत सिद्धरामेश्वर मंदिराकडे मार्गस्थ झाल्या़ अक्कलकोट पाणी टाकी, जोडबसवण्णा चौक, औद्योगिक बँकमार्गे पालख्या सोन्नलगी मंदिरात आल्या़ यावेळी महापौर सुशीला आबुटे यांच्या हस्ते पालख्यांची पूजा करण्यात आली़ काही वेळातच पालख्या पुढे मार्गस्थ झाल्या़ कोंतम चौक, कुंभार वेस, शिवानुभव मंगल कार्यालय, चाटी गल्ली, बाळीवेस, विजापूर वेस, पंचक?ामार्गे दुपारी 1 वाजता पालख्या सिद्धरामेश्वरांच्या मंदिरात दाखल झाल्या़ दिवसभर महाप्रसाद वाटप आणि धार्मिक कार्यक्रम पार पडल़े त्यानंतर सायंकाळी 4 वाजता या सर्व पालख्या गावाकडे मार्गस्थ झाल्या़ सिद्धरामेश्वरांना साकडे पालख्या सिद्धेश्वर मंदिरात येताच पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते शिवयोग समाधीची पूजा करण्यात आली़ यावेळी मंदिर समितीचे व्यवस्थापक गुंडप्पा कारभारी, ट्रस्टी धर्मराज काडादी, मनपा आयुक्त विजयकुमार काळम-पाटील, सोमशंकर देशमुख, मल्लिकार्जुन वाकळे, गुंडप्पा कारभारी, काशिनाथ दर्गोपाटील, आनंद हब्बू, विश्वनाथ हब्बू, महेश हब्बू, केदारनाथ हब्बू, आनंद हब्बू, प्रशांत हब्बू, सिद्धलिंग हब्बू यांची प्रमुख उपस्थिती होती़ यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते पूजा करण्यात आली़ त्यांनी सोलापूरवरील दुष्काळाचे सावट हटवण्याचे साकडे ग्रामदैवताला घातल़े रात्री 9़30 वाजता मंदिरात महाआरती झाली़ (प्रतिनिधी)मेघडंबरीच्या सजावटीने वेधले लक्ष तिसर्या सोमवारी शिवयोग समाधीपुढे अक्की (तांदूळ) पूजा करण्यात आली़ मेघडंबरीची फुलांनी सजावट आणि अक्की पूजा ही शिवानंद कोनापुरे यांच्या वतीने करण्यात आली होती़ विविध फुलांनी सजलेली मेघडंबरी सार्या भक्तांसाठी लक्षवेधी ठरली़ दिवसभरात लाखो भाविकांनी सिद्धरामेश्वरांचे दर्शन घेतल़े 32 गावच्या पालख्याहोटगी, होटगी मठ एमआयडीसी, शिंगडगाव, कुंभारी, कोन्हाळी, दोड्याळ, वडगाव, रामपूर, तोगराळी, भोसगा, हालहळ्ळी, कर्जाळ, लिंबीचिंचोळी, वळसंग, दर्शनाळ, दोड्डी, अंकलगी, चपळगाववाडी, बासलेगाव, तीर्थ, हंजगी, दर्गनहळ्ळी, मोट्याळ, खानापूर, कर्जाळ, बोरामणी, बदलापूर, चुंगी, डोंबरजवळगे, कोराळी, मुस्ती, कि णी, मुळेगाव, शिरपनहळ्ळी, सरसंबा (ता़ आळंद)