शाही पर्वणीसाठी साधुग्राम सज्ज
By admin | Published: August 28, 2015 11:37 PM2015-08-28T23:37:15+5:302015-08-28T23:37:15+5:30
नाशिक : एका तपापासून ज्या क्षणाची संत-महंत, भाविकांना प्रतीक्षा होती, त्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या शाहीस्नानासाठी साधुग्राम सज्ज झाले आहे. पर्वणीच्या पूर्वसंध्येला अवघे साधुग्राम गजबजून गेले होते.
Next
न शिक : एका तपापासून ज्या क्षणाची संत-महंत, भाविकांना प्रतीक्षा होती, त्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या शाहीस्नानासाठी साधुग्राम सज्ज झाले आहे. पर्वणीच्या पूर्वसंध्येला अवघे साधुग्राम गजबजून गेले होते. साधुग्राममध्ये तिन्ही अनी आखाड्यांमधील प्रमुख महंतांनी आपापल्या आखाड्यात बैठक घेऊन शाही मिरवणूक व पर्वणीचे नियोजन केले. मिरवणुकीत सहभागी होणार्या वाहनांच्या सजावटीचे काम सुरू होते. स्थानिक तथा बाहेरगावाहून आलेल्या भाविकांनीही साधुग्राममध्ये प्रचंड गर्दी केली होती. साधुग्रामकडे जाणारे रस्ते पोलिसांनी दुपारनंतर बॅरिकेड्स लावून वाहनांसाठी बंद केले होते. पोलिसांच्या वतीने भाविकांना वेळोवेळी सूचना दिल्या जात होत्या. त्यामुळे भाविक पायीच विविध खालशांत जाऊन साधू-महंतांचे दर्शन घेत होते. शुक्रवारी शहरातील रस्ते, दुकाने, आस्थापना बंद राहणार असल्याचे प्रशासनाने आधीच जाहीर केले होते. या सुटीमुळे भाविकांनी साधुग्रामकडे धाव घेतली होती. भजन-प्रवचनांनी साधुग्राम दुमदुमून गेले होते. रात्री उशिरा खालशांच्या वाहनांच्या सुशोभिकरणाचे काम सुरू झाले. फुलांच्या माळांनी ही वाहने सजवली जात होती.