साध्वी प्रज्ञाला जामिन मंजूर होणार ?
By admin | Published: June 6, 2016 08:48 AM2016-06-06T08:48:28+5:302016-06-06T09:30:42+5:30
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरला जामिन मंजूर होऊ शकतो.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरला जामिन मंजूर होऊ शकतो. प्रज्ञा ठाकूरच्या जामिन अर्जाला विरोध न करण्याचा निर्णय राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) घेतला आहे. सोमवारी मुंबईत विशेष न्यायालयासमोर प्रज्ञा ठाकूरचा जामिन अर्ज सुनावणीसाठी येणार आहे.
एनआयएकडून जामिनाला विरोध होणार नसला तरी, अंतिम निर्णय सर्वस्वी न्यायालयावर अवलंबून असेल. एनआयएने साध्वी प्रज्ञाला क्लीनचीट दिली आहे. यापूर्वी एनआयएने जो पायंडा घालून दिला त्याचेच आम्ही पालन करत आहोत. पहिल्या मालेगाव स्फोटातील नऊ मुस्लिम आरोपींच्या जामिनाला एनआयएने विरोध केला नव्हता.
महाराष्ट्र एटीएस आणि सीबीआयने त्यांच्यावर ठपका ठेवला होता असे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले. मालेगावमध्ये २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटा प्रकरणी प्रज्ञाला त्यावर्षी अटक झाली होती. तेव्हापासून ती तुरुंगातच आहे.
मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने दाखल केलेल्या आरोपपत्रात एनआयएने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि कर्नल श्रीकांत पुरोहित यांच्यावरील मोक्कातंर्गत आरोप हटवले आहेत. यामुळे प्रज्ञा सिंहला मोठा दिलासा मिळाला आहे. स्फोटातील प्रज्ञाचा सहभाग स्पष्ट करणारे ठोस पुरावे मिळाले नसल्याने तिच्यावरील मोक्का हटवला होता.