साध्वीं प्रज्ञा 'त्या' संस्कृतीचं प्रतिक, मोदींकडून भोपाळमधील उमेदवारीचं समर्थन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 08:59 AM2019-04-20T08:59:29+5:302019-04-20T09:07:25+5:30
पंतप्रधान नरेद्र मोदींना टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीला विशेष मुलाखत दिली. त्यावेळी, बोलताना मोदींनी
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनीभोपाळमधील साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या उमेदवाराचं समर्थन केलं आहे. दशतवादाविरुद्ध कडक पाऊल उचलणाऱ्या मोदी सरकारने साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना लोकसभेची उमेदवारी कशी दिली? असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींना टाईम्स नाऊ वाहिनीच्या मुलाखतीत विचारण्यात आला होता. त्यावर, बोलताना मोदींनी प्रज्ञा सिंग यांची उमेदवारी एका महान संस्कृतीचं प्रतिक असून काँग्रेसला ते महागात पडेल, असे मोदींनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेद्र मोदींना टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीला विशेष मुलाखत दिली. त्यावेळी, बोलताना मोदींनी विविध विषय, राफेल, दहशतवादी, काश्मीर घुसकोरी, मोदींपुढील आव्हाने यांबाबत सविस्तर चर्चा केली. त्याचदरम्यान, मोदींना साध्वी ठाकूर यांना दिलेल्या उमेदवारीबाबत प्रश्न करण्यात आला होता. त्यावर, मोदींनी इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या, शीख हत्यांचा संदर्भ देत उत्तर दिले. तसेच, साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्या उमेदवारीचे समर्थनही केले. विशेष म्हणजे, साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी मुंबई हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल खळबळजनक विधान केले होते. त्यानंतर, काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांकडून साध्वींच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. दरम्यान, साध्वी यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली असून ते माझे वैयक्तिक मत असल्याचीही कबुली दिली आहे.
साध्वी प्रज्ञांच्या उमेदवारीच्या प्रश्नावर पंतप्रधान मोदींचे उत्तर
''एक महिला को वो भी एक साध्वी को इस प्रकार से प्रताड़ित किया गया। और मैं गुजरात में रहकर आया हूं। मैं कांग्रेस को भलीभांति समझ गया हूं। जैसे फिल्म की स्क्रिप्ट लिखते हैं। पहले कागज पर बैठकर स्क्रिप्ट लिखते हैं। हमारे यहां जितने इनकाउंटर हुआ सबको ऐसे ही चलाया गया। हर घटना को ऐसे खींचते थे और जोड़ देते थे।
दुसरीबात मैने देखा, जस्टीक लोया का नॅचरल मृत्यू हुआ था उनका केस एैसे बना दिया, जैसे उनकी हत्या हो गयी. और इन दिनो भी ईव्हीएम को लेकर लंडन मे प्रेस करनेवाले लोग थे, अभी उन्होने झुठी व्हीडिओ बनाकर, डिमोनिटायजेशनपर ड्रामा किया, चार दिन पहिलेभी एैसाही ड्रामा किया था, तो ये उनकी मोडस ऑपरेंडी है, उसी मोडस ऑपरेंडी का हिस्सा है, और समझोता एक्सप्रेस का जजमेंट आ गया, क्या निकला ? और आप ने बिना सबुत के..., दुनिया मे 5 हजार साल तक जिस महान संस्कृती और परंपराने वसुधै कुटुंबम का संदेश दिया, सर्वेत सुखीना संतु, सर्वे संतु निरायमा का संदेश दिया, जिस संस्कृतीने एकंमसद बहुदा वंदतिका का संदेश दिया, एैसी संस्कृती को आपने आंतकवादी कह दिया. उन सबको जबाव देने के लिए ये सिम्बॉल है, और ये सिम्बॉल काँग्रेस को महंगा पडनेवाला है,''
असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींना साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या उमेदवारीचे समर्थन केलं आहे.''
दरम्यान, 2008 मध्ये मुंबईवर हल्ला झाला तेव्हा मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. तरीही ते तातडीने मुंबईत आले आणि शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांची त्यांनी भेटही घेतली. या शहीदांना गुजरात सरकारतर्फे एक कोटी रुपयांचे साह्य़ त्यांनी जाहीर केले. करकरे यांच्या पत्नी कविता करकरे यांनी ते साह्य़ साभार नाकारले होते.