‘सरकारचे भगवे आक्रमण’

By admin | Published: February 21, 2015 03:49 AM2015-02-21T03:49:53+5:302015-02-21T03:49:53+5:30

हिंदुत्ववादी शक्तींचे हित जोपासण्यासाठी उजव्या संघटनांकडून आक्रमण केले जात असल्याचा आरोप माकपचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी केला.

'Saffron aggression of the government' | ‘सरकारचे भगवे आक्रमण’

‘सरकारचे भगवे आक्रमण’

Next

अलाप्पुझा : मोदी सरकार म्हणजे रा.स्व. संघ व भाजपचा संयुक्त उद्योग (जॉइंट एन्टरप्रायजेस) असून कॉर्पोरेटस् व हिंदुत्ववादी शक्तींचे हित जोपासण्यासाठी उजव्या संघटनांकडून आक्रमण केले जात असल्याचा आरोप माकपचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी केला.
माकपच्या २१ व्या राज्य परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. अमेरिकेसोबत झालेल्या संरक्षण कराराचा आराखडा जनतेपासून दडवून ठेवण्यात आला आहे. अल्पसंख्यकांवरील हल्ले चिंताजनक असून संस्कृती व कलेच्या क्षेत्रात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालत असहिष्णुतेला खतपाणी घातले जात आहे. (वृत्तसंस्था)

 

Web Title: 'Saffron aggression of the government'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.