सहारा डायऱ्यांची मोदी यांना भीती का?
By admin | Published: January 6, 2017 02:20 AM2017-01-06T02:20:03+5:302017-01-06T02:20:03+5:30
सहारा डायऱ्यांची चौकशी करा, अशी मागणी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी येथे केली. पंतप्रधान मोदी यांना या डायऱ्यांच्या चौकशीची भीती वाटते की काय, असा सवालही त्यांनी केला.
नवी दिल्ली : सहारा डायऱ्यांची चौकशी करा, अशी मागणी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी येथे केली. पंतप्रधान मोदी यांना या डायऱ्यांच्या चौकशीची भीती वाटते की काय, असा सवालही त्यांनी केला.
मोदी यांची सद््सद््विवेकबुद्धी स्पष्ट असेल, तर ते चौकशीपासून दूर का जात आहेत? संरक्षण हे सहाराला की मोदीजींना? असे गांधी टिष्ट्वटरद्वारे विचारले आहे. इन्कम टॅक्स सेटलमेंट कमिशनने (आयटीएससी) सहाराला खटल्यापासून व दंडापासून संरक्षण दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर गांधी यांनी हे प्रश्न विचारले.
नोव्हेंबर २०१४ मध्ये सहारावर टाकलेल्या छाप्यांत ‘त्या’ डायऱ्या हाती लागल्या होत्या. राजकीय नेत्यांना लाच दिल्याची यादी या डायऱ्यांत होती. छाप्यांमध्ये जे सुटे कागद हाती लागले, त्यांचे पुराव्याच्या दृष्टीने सिद्ध होत नाही, असे प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे. सहाराच्या दाव्याशी प्राप्तिकर विभागाच्या सेटलमेंट कमिशनचे एकमत झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कमिशनने कंपनीचा अर्ज आधी फेटाळला होता व त्यानंतर, ५ सप्टेंबर २०१६ रोजी तो पुन्हा दाखल करून घेतला. त्या कागदपत्रांचा पुरावा म्हणून वापर करता येत नाही, असा दावा कमिशनने केल्याचा उल्लेख बातम्यांमध्ये आहे. त्यामुळे वादळ उठले आहे.