नूहमध्ये ज्या हॉटेलमधून दगडफेक झाली ते हॉटेल बुलडोझरने पाडले; आतापर्यंत ६०० हून अधिक बांधकामे जमीनदोस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2023 11:15 AM2023-08-06T11:15:17+5:302023-08-06T11:15:39+5:30

हरियाणाच्या नूहमध्ये हिंसाचार थांबल्यानंतर सरकार आता अॅक्शन मोडमध्ये आले आहे. ३१ जुलै रोजी नूह जिल्ह्यातील बडकाली भागात दंगल आणि जाळपोळ सुरू झाली.

sahara family restaurant hotel in nuh pelted with stones bulldozers demolished 600 constructions demolished | नूहमध्ये ज्या हॉटेलमधून दगडफेक झाली ते हॉटेल बुलडोझरने पाडले; आतापर्यंत ६०० हून अधिक बांधकामे जमीनदोस्त

नूहमध्ये ज्या हॉटेलमधून दगडफेक झाली ते हॉटेल बुलडोझरने पाडले; आतापर्यंत ६०० हून अधिक बांधकामे जमीनदोस्त

googlenewsNext

हरियाणातील नूह येथील हिंसाचारानंतर सरकार अॅक्शन मोडमध्ये आले आहे. सरकारी यंत्रणांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. आता तेथील बेकायदा मालमत्ताही पाडल्या जात आहेत. यासोबतच दगडफेकीच्या घटना घडलेल्या ठिकाणांचाही शोध घेतला जात आहे. हिंसाचाराच्यावेळी ज्या हॉटेलमधून दगडफेक झाली होती ते हॉटेल प्रशासनाने बुलडोझरच्या सहाय्याने शनिवारी पाडले आहे. आतापर्यंत ६०० हून अधिक बेकायदा बांधकामे पाडण्यात आली आहेत. संपूर्ण हरियाणामध्ये सुमारे १०४ एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. सुमारे २१६ अटक करण्यात आली असून ८३ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

हरियाणाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी तिसऱ्या दिवशी हिंसाचारग्रस्त नूह जिल्ह्यात बेकायदा बांधकामे पाडण्याची मोहीम सुरू केली. यादरम्यान डझनभर बेकायदा बांधकामे पाडण्यात आली आहेत. यातील काही मालमत्ता अशा लोकांच्याही होत्या ज्यांचा अलीकडील संघर्षात सहभाग असल्याचा आरोप आहे.

नूहचे सहारा फॅमिली रेस्टॉरंटही शनिवारी जमीनदोस्त करण्यात आले. ३१ जुलै रोजी नूह हिंसाचाराचे काही व्हिडीओ आणि फुटेज समोर आले आहेत. मेडिकल चौकात असलेल्या या रेस्टॉरंटच्या छतावरून मिरवणुकीवर दगडफेक सुरू झाल्याचे त्या फुटेजमध्ये दिसल्याचा आरोप आहे. येथूनच नुह्यात वादाला सुरुवात झाली. रेस्टॉरंटच्या तीनही मजल्यावरून दगडफेकही करण्यात आली. रेस्टॉरंटच्या आजूबाजूच्या इमारती आणि दुकानांच्या छतावरूनही दगडफेक करण्यात आली. पोलीस दल आणि भाविकांवर दगडफेक करण्यात आली. अशा इमारती, दुकानेही प्रशासनाने जमीनदोस्त केली आहेत.

राज्यातील रेल्वेस्थानकांचा होईल शॉपिंग मॉल; ४४ रेल्वेस्थानकांचे रूपडे पालटणार

शनिवारी सहारा फॅमिली रेस्टॉरंटबाहेर प्रशासनाचे पथक दोन बुलडोझर घेऊन पोहोचले. अगोर तळमजला पाडण्यात आला. खालचा भाग पूर्णपणे खाली पडला आहे. वरचा भाग पाडण्यासाठी मोठमोठ्या मशीन आणल्या जात आहेत. संपूर्ण रेस्टॉरंट भंगारात बदलण्याची तयारी सुरू आहे. २०१६ पासून या इमारतींच्या मालकांना नोटिसा दिल्या जात असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, उत्तर दिले जात नव्हते. नूह हिंसाचारानंतर प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले आहे. बाजारातून इतर भागात कारवाई करण्यात येत आहे.

हरियाणाच्या सीआयडीच्या इन्स्पेक्टरचा व्हिडीओ व्हायरल होत असतानाच त्याने हिंसाचाराची माहिती दिल्याचा इन्स्पेक्टरचा दावा आहे. या व्हिडिओमध्ये इन्स्पेक्टरने दावा केला आहे की, त्याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळीच हिंसाचाराची माहिती दिली होती. राज्याचे गृहमंत्री अनिल विज यांनी या व्हिडिओच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. 'वातावरण खराब होऊ दिले जाणार नाही' एडीजीपी ममता सिंह यांनी नूह हिंसाचाराच्या तपासाबाबत माहिती दिली. ते म्हणाले, आम्ही सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहोत. सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांना मी वातावरण बिघडवण्याचा इशारा देतो. त्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ दिले जाणार नाहीत. हरियाणा पोलीस कडक कारवाई करणार आहेत. संपूर्ण हरियाणामध्ये सुमारे १०४ प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. सुमारे २१६ अटक करण्यात आली आहे.

Web Title: sahara family restaurant hotel in nuh pelted with stones bulldozers demolished 600 constructions demolished

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.