पुराने उद्ध्वस्त केलं, लेकीच्या लग्नासाठी जमवलेलं सर्व सामान वाहून गेलं; डोळे पाणावणारी घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 11:56 AM2024-10-03T11:56:08+5:302024-10-03T11:56:49+5:30
पुरामुळे सहरसा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पुरामुळे अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली असून अनेक लोक बेघर झाले आहेत. घरात पुराचं पाणी शिरल्याने लोकांची स्वप्नं वाहून गेली आहेत.
बिहारमधील कोसी नदीला आलेल्या पुरामुळे सहरसा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पुरामुळे अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली असून अनेक लोक बेघर झाले आहेत. घरात पुराचं पाणी शिरल्याने लोकांची स्वप्नं वाहून गेली आहेत. परिस्थिती अशी आहे की अनेक लोक अजूनही त्यांच्या घराबाहेर तात्पुरत्या निवाऱ्यात राहत आहेत, तर काही लोक त्यांची उद्ध्वस्त झालेली घरं पुन्हा बांधण्याचा प्रयत्न करत आहेत.
स्थानिक लोकांना त्यांची घरं पुन्हा बांधता यावीत, यासाठी सरकारकडे मदतीची अपेक्षा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सहरसा जिल्ह्यातील महर्षी ब्लॉकच्या कुंडा पंचायतीला आलेल्या पुरामुळे संपूर्ण गाव पाण्याखाली गेलं. शेतात उभं असलेलं भातपीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालं.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गावामध्ये त्यांनी अशी परिस्थिती यापूर्वी कधीही पाहिली नव्हती. अचानक आलेल्या पुरामुळे लोकांना काहीच करण्याची संधीच मिळाली नाही आणि त्यांचं सर्व सामान पाण्यात वाहून गेलं. अनेक कच्च्या घरांची पडझड झाली तर काही घरं पूर्णपणे पाण्यात बुडाली आहेत.
आपली सर्व स्वप्नं पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. एका व्यक्तीने सांगितलं की, त्याच्या मुलीच्या लग्नासाठी जमवलेल्या सर्व वस्तू पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. आता आपलं घर कसं बांधणार आणि पुढचं जीवन नेमकं कसं जगणार याची चिंता लोकांना वाटू लागली आहे.
पुनर्वसन आणि भरपाईसाठी ग्रामस्थ आता सरकारकडे मदतीसाठी पाहत आहेत. लोकांना आशा आहे की, सरकार त्यांना घरं बांधण्यासाठी आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मदत करेल, जेणेकरून त्यांचे जीवन पुन्हा रुळावर येईल. या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून मोठं नुकसान झालं आहे.