"त्याला दोन व्यसनं होती, एक बाई अन् दुसरं...!"; समोर आली साहिलची आजी, सांगितलं सौरभच्या हत्येमागचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 12:16 IST2025-03-27T12:15:35+5:302025-03-27T12:16:31+5:30
साहिलची आजी बुधवारी बुलंदशहर येथून मेरठ येथे कारागृहात बंद असलेल्या साहिलला भेटण्यासाठी आली होती. मात्र, यावेळी त्या साहिलपेक्षाही सौरभच्या बाजूने अधिक बोलल्याचे दिसले...

"त्याला दोन व्यसनं होती, एक बाई अन् दुसरं...!"; समोर आली साहिलची आजी, सांगितलं सौरभच्या हत्येमागचं कारण
सध्या संपूर्ण देशभरात उत्तर प्रदेशातील मेरठ (Meerut Murder Case) येथील सौरभ मर्डर केसची चर्चा सुरू आहे. सध्या सौरभची पत्नी मुस्कान आणि तिचा प्रियकर गजाआड आहे. सौरभचे कुटुंबीय मुस्कानच्या कुटुंबीयांवर विविध प्रकारचे आरोप करत आहेत. मात्र, मुस्कानचे कुटुंबीय ते आरोप फेटाळून लावत आहेत. यातच आता, साहिलची आजी (आईची आई) समोर आली आहे. महत्वाचे म्हणजे, मेरठ येथील साहिलच्या घराला कुलूप लागले आहे. त्याचे वडील नोएडामध्ये राहतात."
साहिलची आजी बुधवारी बुलंदशहर येथून मेरठ येथे कारागृहात बंद असलेल्या साहिलला भेटण्यासाठी आली होती. मात्र, यावेळी त्या साहिलपेक्षाही सौरभच्या बाजूने अधिक बोलल्याचे दिसले. त्या म्हणाल्या, मला साहिलपेक्षाही सौरभचे अधिक वाईट वाटते. सोरभ सोबद फार वाईट घडले. आपण साहिलचे नवे कपडे आणि चिवडा घेऊन आलो आहोत. यावेळी साहिलच्या वडिलांसंदर्भात महिन्याला येतात. आता ते येतील की नाही, हे मी सांगू शकत नाही.
साहिलला दोन व्यसनं लागली होती... -
साहिलची आजी म्हणाली, "त्याला (साहिल) दोन-दोन व्यसनं लागली होती. एक म्हणजे 'नशा' करण्याचे व्यसन, तर दुसरे 'बाई'चे, व्यसन. हे सर्वात मोठे व्यसन झाले. हे सर्व घडण्यामागे हे कारणही असू शकते."
नियमानुसार भेट झाली -
साहिलच्या आजीच्या या भेटीसंदर्भात बोलताना मेरठचे वरिष्ठ तुरुंग अधीक्षक डॉ. विरेशे राज शर्मा म्हणाले, "साहिलच्या आजीने या भेटीसाठी नियमांनुसार अर्ज केला होता. तुरुंग नियमावलीनुसार, कुटुंबातील सदस्यांना कैद्याला भेटण्याची परवानगी आहे आणि आजी देखील याच श्रेणीत येतात. म्हणून त्यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली. ते म्हणाले, कारागृहात साहिलसोबत कसल्याही प्रकारची मारहाण अथवा गैरवर्तन करण्यात आल्याचे वृत्त निराधार आहे.