साईंच्या चित्रांची नक्कल करणार्यांवर कायद्याचा बडगा शिर्डीत धाडसत्र : निगडीत व्यापार्याला अटक
By admin | Published: February 1, 2016 12:03 AM2016-02-01T00:03:59+5:302016-02-01T00:03:59+5:30
शिर्डी : साईबाबांवर अखिल मानवजातीचा हक्क असला तरी चित्रकारांनी स्वयंकल्पनेतून त्यांच्या काढलेल्या चित्रांना मात्र कॉपीराईट लागू आहे़ अशा चित्रांची नक्कल करून हे फोटो विकणार्या व्यापार्यांना पोलिसांचा पाहुणचार मिळाला आहे़ काल रात्रभर निगडी पोलिसांनी या संदर्भात शिर्डीत वेगवेगळ्या व्यापार्यांवर धाडी टाकल्या़
Next
श र्डी : साईबाबांवर अखिल मानवजातीचा हक्क असला तरी चित्रकारांनी स्वयंकल्पनेतून त्यांच्या काढलेल्या चित्रांना मात्र कॉपीराईट लागू आहे़ अशा चित्रांची नक्कल करून हे फोटो विकणार्या व्यापार्यांना पोलिसांचा पाहुणचार मिळाला आहे़ काल रात्रभर निगडी पोलिसांनी या संदर्भात शिर्डीत वेगवेगळ्या व्यापार्यांवर धाडी टाकल्या़येथील चित्रकार हेमंत शिवाजी वाणी हे व्यावसायिक चित्रकार असून त्यांची येथे साईबाबा आर्ट गॅलरी आहे़ हेमंत यांनी साईबाबांचे डोळे चारकोल कोळशाने रेखाटले आहेत़ बाबांची कृपादृष्टी या नावाने या चित्रास त्यांनी केंद्र सरकारचे कॉपीराईट मिळवले आहेत़ या चित्रात थोडेफार बदल करून हे चित्र मार्केटला विकले जात होते़ ही बाब हेमंत यांनी वारंवार शिर्डी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली़ मात्र, पोलिसांच्या जुजबी कारवाईने येथील व्यापार्यांचे मनोधैर्य बळावले व या फोटोंची सर्रास विक्री सुरू झाली़ अखेर हेमंत यांनी या चित्राच्या हक्काचे संरक्षण करण्याचे अधिकार नगरच्या न्यू इंडिया मल्टी सर्व्हिसेस कंपनीस दिले़यानंतर गेल्या दोन दिवसापूर्वी या कंपनीच्या तक्रारीवरुन निगडी पोलिसांनी शिर्डीतील एका व्यापार्यास पुण्यात सापळा रचून पकडले़ त्याच्याकडून पोलिसांनी कॉपीराईट असलेले सहाशे फोटो, एका गाडीसह दोघांना अटक केली़ या दोघांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली होती़ त्यावेळी केलेल्या चौकशीतून शिर्डीतील आणखी चार मोठ्या व्यापार्यांची नावे पुढे आली़ त्यातून निगडी पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री शिर्डीतील अनेक व्यापार्यांवर धाडी टाकल्या़ अशा प्रकारच्या कारवाया दुकानदार व व्यापार्यांवर यापुढेही सुरू राहतील, असे न्यू इंडिया मल्टी सर्व्हिसेस कंपनीचे सुनील त्र्यंबके यांनी सांगितले़ (तालुका प्रतिनिधी)----------------------------------------------------------------------------------------------------3101-2016-साई-01कॉपी राईट असलेले साईंचे डोळे,जेपीजे