साईबाबाला सुप्रीम कोर्टाकडून जामीन
By admin | Published: April 5, 2016 12:15 AM2016-04-05T00:15:53+5:302016-04-05T00:15:53+5:30
सध्या नागपूरच्या कारागृहात असलेला दिल्ली विद्यापीठाचा प्रो. जी.एन. साईबाबा याला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला. महाराष्ट्र सरकारने त्याला
नवी दिल्ली : सध्या नागपूरच्या कारागृहात असलेला दिल्ली विद्यापीठाचा प्रो. जी.एन. साईबाबा याला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला. महाराष्ट्र सरकारने त्याला अटकेत ठेवणे अन्यायकारक होते, असे जे.एस. खेहार आणि सी. नागप्पन यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. जामीनाला विरोध करणाऱ्या राज्य सरकारच्या वकिलाची खंडपीठाने चांगलीच कानउघाडणी केली. माओवाद्यांशी संबंध असल्यावरून साईबाबाला अटक करण्यात आली होती.
अपंग असलेल्या प्रो. साईबाबाला व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागत असून त्याची वैद्यकीय स्थिती आणि पुराव्याची शहानिशा झाली असताना त्याला कारागृहात ठेवण्याचा कोणताही मुद्दा दिसत नाही, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. काही महत्त्वाच्या साक्षीदारांची तपासणी आवश्यक असल्याचे सरकारी वकिलांनी म्हटले होते. कनिष्ठ न्यायालयाने मुख्य साक्षीदारांची तपासणी करावी, तसेच दैनंदिन सुनावणी पार पाडावी असा आदेश खंडपीठाने २९ फेब्रुवारी रोजी दिला होता. सरकारने एकूण ३४ जणांना साक्षीदार बनविले असून त्यापैकी ८ जणांच्या साक्षी अद्याप व्हायच्या आहेत.