...म्हणून विद्यापीठातील 150 विद्यार्थ्यांचं टक्कल करण्यात आले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 04:25 PM2019-08-21T16:25:33+5:302019-08-21T16:43:15+5:30

देशभरात रॅगिंगवर बंदी असताना उत्तरप्रदेशमधील सैफई विद्यापीठमध्ये ‘रॅगिंग’ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Saifai 150 students seen with shaved heads on campus allegedly as part of ragging | ...म्हणून विद्यापीठातील 150 विद्यार्थ्यांचं टक्कल करण्यात आले

...म्हणून विद्यापीठातील 150 विद्यार्थ्यांचं टक्कल करण्यात आले

Next

उत्तरप्रदेश: देशभरात रॅगिंगवर बंदी असताना उत्तरप्रदेशमधील सैफई विद्यापीठमध्ये ‘रॅगिंग’ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सैफई विद्यापीठाची अशी काही फोटो समोर आले आहेत की, ते पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. एमबीबीएसमध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सुमारे 150 विद्यार्थ्यांचे टक्कल केले आहे. विद्यापीठमधील सीनियर विद्यार्थ्यांना सॅल्युट न केल्यामुळे ज्यूनियर विद्यार्थ्यांना शिक्षा दिल्याचे समोर आले आहे.   

इटावा येथे सैफई विज्ञान विद्यापीठ आहे ज्यास मिनी पीजीआय देखील म्हटले जाते. एक नवीन सत्र सुरू झाले आहे आणि यासह रॅगिंग देखील सुरू झाली आहे. विद्यापीठात जर एखादा सीनियर विद्यार्थी कुठेही आढळून आल्यास नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यांना सॅल्युट करायला लागायचा. तसेच वसतिगृहातून विद्यापीठेत जाताना लाइन लावून जावे लागायचे आणि लाइन तोडल्यास सीनियर विद्यार्थी शिवीगाळ करत असे.

याबाबत सैफई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.राजकुमार यांनी सर्व आरोप फेटाळून लावत कॅम्पसमध्ये कोणत्याही प्रकारचे रॅगिंग झाले नसल्याचे स्पष्ट केले. तसेच असा काही प्रकार घडल्यास दोषींवर कारवाई करण्याचे देखील आश्वासन दिले. त्याचप्रमाणे विद्यापीठात रॅगिंग होऊ नये यासाठी सर्व बंदोबस्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Saifai 150 students seen with shaved heads on campus allegedly as part of ragging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.