येमेनमध्ये अडकले गुजरातचे खलाशी
By admin | Published: September 14, 2015 01:20 AM2015-09-14T01:20:04+5:302015-09-14T01:42:20+5:30
गुजरातमधील ७० खलाशी गत १५ दिवसांपासून येमेनमध्ये अडकले आहेत. हे नागरिक जामनगरच्या जोडिया, सलाया गावातील रहिवासी आहेत, असे येथे कळालेल्या वृत्तात म्हटले आहे.
Next
अहमदाबाद : गुजरातमधील ७० खलाशी गत १५ दिवसांपासून येमेनमध्ये अडकले आहेत. हे नागरिक जामनगरच्या जोडिया, सलाया गावातील रहिवासी आहेत, असे येथे कळालेल्या वृत्तात म्हटले आहे.
खलाशांच्या संघटनेचे अध्यक्ष हाजी जुनेजा यांनी सांगितले की, हे ७० खलाशी पाच मालवाहू नौकांसह येमेनमध्ये अडकले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी सरकारच्या मदतीची गरज आहे. मागील काही दिवसांत येमेनमध्ये होत असलेल्या हवाई हल्ल्यात सहा भारतीय नागरिक ठार झाले आहेत.
येमेनमध्ये फसलेल्या सिकंदर नावाच्या एका खलाशाने एक आॅडिओ संदेश पाठविला असून त्यात म्हटले आहे की, येथे हवाई हल्ले होत असून आम्ही अतिशय तणावाखाली राहत आहोत, कृपया आमची मदत करावी.