फूस लावणाऱ्यांनो, उत्तर द्यावे लागेल

By admin | Published: August 29, 2016 02:46 AM2016-08-29T02:46:27+5:302016-08-29T02:46:27+5:30

एकता आणि प्रेम हाच काश्मीर प्रश्नावर मूलमंत्र आहे, असे सांगतानाच अशांततेसाठी मुलांना फूस देणाऱ्यांना एक दिवस या ‘निष्पापांसमोर’ उत्तर द्यावे लागेल, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले

The sailors, have to answer | फूस लावणाऱ्यांनो, उत्तर द्यावे लागेल

फूस लावणाऱ्यांनो, उत्तर द्यावे लागेल

Next

नवी दिल्ली : एकता आणि प्रेम हाच काश्मीर प्रश्नावर मूलमंत्र आहे, असे सांगतानाच अशांततेसाठी मुलांना फूस देणाऱ्यांना एक दिवस या ‘निष्पापांसमोर’ उत्तर द्यावे लागेल, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. काश्मिरात जर कुठल्याही व्यक्तीचा किंवा सुरक्षा कर्मचाऱ्याचा जीव जात असेल तर ते आमच्या देशाचे नुकसान आहे, असेही ते म्हणाले.
मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’मधून हे मत व्यक्त केले. ते म्हणाले, काश्मीर प्रश्नावर सर्वपक्षीयांशी चर्चा केल्यानंतर एक बाब प्रामुख्याने समोर आली आहे. ती म्हणजे प्रेम आणि एकता. काश्मीरवर सर्व राजकीय पक्षांनी एका सुरात यावर मत व्यक्त केले आहे. हा संदेश पूर्ण जगात आणि फुटीरवाद्यांपर्यंत पोहोचला आहे. काश्मीरच्या लोकांपर्यंत या माध्यमातून आमच्या भावना पोहोचल्या आहेत. मोदी यांनी या एकीची संसदेतील जीएसटी विधेयकाशी तुलना केली.
मोदी म्हणाले की, ही सर्वांची भावना आहे, अगदी गावातील सरपंचापासून ते पंतप्रधानांपर्यंत १२५ कोटी नागरिकांना असे वाटते की, काश्मिरात एकाही व्यक्तीचा मृत्यू होत असेल तर ते देशाचे नुकसान आहे. ‘मन की बात’ कार्यक्रमात मोदी यांनी आॅलिम्पिकमधील महिला शक्तीचे कौतुक केले. बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू व साक्षी मलिकचा उल्लेख केला. जिम्नॅस्टिक दीपा कर्माकर हिचेही त्यांनी कौतुक केले.


मोदींच्या निषेधाचा ठराव बलुच प्रांतिक मंडळात
पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्य दिनी केलेल्या भाषणात पाकिस्तानचा प्रांत बलुचिस्तानबाबत केलेल्या उल्लेखाबद्दल त्यांचा निषेध करणारा ठराव बलुचिस्तान प्रांतिक कायदे मंडळात एकमताने संमत करण्यात आला.
पाकिस्तान मुस्लीम लीगचे (नवाज) प्रतिनिधी मुहम्मद खान लेहरी यांनी हा ठराव सभागृहात मांडला तर मुख्यमंत्री सनाउल्ला जेहरी यांनी त्यावर सही केली. तत्पूर्वी, सगळ्या पक्षांनी या ठरावाला अनुमोदन दिले होते.

पाकविरोधात निदर्शने : काश्मीर प्रश्नाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानची शनिवारी मोठी कोंडी झाली. जर्मनीच्या लेपझिग शहरात बलुचिस्तानातील काही डझन निर्वासितांनी पाकिस्तानविरोधात व नरेंद्र मोदी यांच्या बाजूच्या घोषणा दिल्या. निदर्शकांच्या हातात भारताचे ध्वज होते. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी काश्मीर प्रश्नाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी २२ लोकप्रतिनिधींच्या नियुक्तीची घोषणा केल्यानंतर ही निदर्शने झाली.

आपल्या चुकांमुळेच काश्मिरी तरुण उतरताहेत रस्त्यावर
आपण सर्वांनी केलेल्या चुकांमुळेच आज काश्मिरी तरुण रस्त्यावर उतरत आहे, असे मत काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केले, तर
‘मन की बात’ कार्यक्रमात मोदी यांनी काश्मीरचा उल्लेख केल्याबद्दल त्यांनी मोदी यांचे कौतुक केले.
ओमर यांनी टिष्ट्वट केले की, गत आठवड्यात विरोधी पक्षांशी चर्चा केल्यानंतर मोदी यांनी या प्रकरणी पुढची वाटचाल सुरू केली आहे. हे पाहून चांगले वाटत आहे.
दगडफेकीच्या घटनांबाबत मोदी यांच्या वक्तव्याचा धागा पकडून ओमर म्हणाले की, आमच्या सर्वांच्या चुकीमुळे आज काही तरुण या आंदोलनाचे शिकार
बनले आहेत.
यापूर्वी ‘मन की बात’ कार्यक्रमात काश्मीरचा उल्लेख न केल्याने ओमर यांनी मोदींवर टीका केली होती.


एकावन्न दिवसांच्या संचारबंदीच्या काळात काश्मीरमधे ७0 लोक ठार तर
सुरक्षा दलाच्या जवानांसह सुमारे ७५00 लोक जखमी झाले. हल्लेखोरांनी
३0 पोलीस ठाण्यांसह काही सरकारी इमारतींवर चढवलेल्या हल्ल्यात,
पोलीस दलाचे ४ जवान व निमलष्करी दलाचा एक अधिकारी हिंसाचारात
ठार झाला.
अतिरेकी निदर्शकांनी १४१ रुग्णवाहिकांसह ३00 सरकारी वाहनांवर
हल्ले चढवून यापैकी काही वाहनांना आग लावून दिली. हा हिंसाचार रोखण्यासाठी पॅलेट गनद्वारा १६ लाख पॅलेटसचा वापर करण्यात आला. त्यात ४00 तरुणांच्या डोळ्यांना इजा झाली. यापैकी १00 जणांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया करावी लागली.

Web Title: The sailors, have to answer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.