संत जॉन चर्च

By admin | Published: December 20, 2014 10:28 PM2014-12-20T22:28:27+5:302014-12-20T22:28:27+5:30

चर्च ओळख

Saint John Church | संत जॉन चर्च

संत जॉन चर्च

Next
्च ओळख
एक ऐतिहासिक वास्तू म्हणून भिंगार येथील संत जॉन चर्चची ओळख आहे़ सन १८५१ मध्ये मुंबई धर्मप्रांताने या चर्चची स्थापना केली़ नाशिक धर्मप्रांतामार्फत चर्चचे कामकाज चालते़ प्रमुख धर्मगुरू म्हणून फादर नेल्सन फालकाव काम पाहतात़ शहरातील सर्वात जुनी वास्तू म्हणून या चर्चची ओळख आहे़ चर्चच्यावतीने वर्षभर सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते़ शहरासह ग्रामीण भागाताही सामाजिक उपक्रम राबविले जातात़ विद्यार्थ्यांसाठी सामाजिक व शैक्षणिक शिबिर, प्रौढांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याचे धर्मगुरू फादर फालकाव यांनी सांगितले़
नाताळानिमित्त चर्चमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे़ चर्चमध्ये व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, येशु ख्रिस्ताच्या जन्माचा देखावा सादर करण्यात येणार आहे़ तसेच सामूहिक प्रार्थना, धर्मगीत गायन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे़

फोटो आहे़ वाजिदची यादी पहावी

Web Title: Saint John Church

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.