राम मंदिर सोहळ्यात संतांना दंड, छत्र व पादुका आणण्यास मनाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 12:03 PM2023-09-25T12:03:04+5:302023-09-25T12:03:45+5:30

जानेवारीतील समारंभाला अयाेध्येत ७ हजार लोक येणार

Saints are prohibited from bringing fines, umbrellas and sandals | राम मंदिर सोहळ्यात संतांना दंड, छत्र व पादुका आणण्यास मनाई

राम मंदिर सोहळ्यात संतांना दंड, छत्र व पादुका आणण्यास मनाई

googlenewsNext

त्रियुग नारायण तिवारी

अयोध्या : अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा पुढील वर्षी २० ते २४ जानेवारीदरम्यान होणार आहे. तथापि, याचे अनुष्ठान १६ जानेवारीपासूनच सुरू होईल. प्राणप्रतिष्ठा समारंभामध्ये रामजन्मभूमी परिसरात सात हजारांवर मान्यवर उपस्थित असतील. सर्वांना सुरक्षा मानकांचे पालन केल्यानंतरच परिसरात प्रवेश मिळेल. साधू-संत या परिसरात दंड, छत्र व पादुका घेऊन प्रवेश करू शकणार नाहीत. 

श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सांगितले की, रामजन्मभूमीच्या ७० एकर परिसरात प्रवेश करणाऱ्या मान्यवरांची यादी तयार केली जात आहे. समारंभात देशातील सर्व जिल्हा, राज्यांतून लोक येणार आहेत. पद्म पुरस्कारप्राप्त मान्यवरांनाही आमंत्रित करण्यात येईल. काही राजदूतही येऊ शकतात. समारंभात पंतप्रधानांसह व्हीआयपी उपस्थित राहणार असल्यामुळे कडक सुरक्षाव्यवस्था करण्यात येणार आहे. रामजन्मभूमी परिसरात सर्वांना सुरक्षा मानकांचे पालन केल्यानंतरच प्रवेश दिला जाईल. पाहुण्यांना एक-दोन किलोमीटर पायीही चालावे लागू शकते. अशा स्थितीत आरोग्य व सर्व स्थिती लक्षात घेऊन पाहुण्यांनी अयोध्येत यावे, असे त्यांनी सांगितले.

    सुरक्षाव्यवस्था एसपीजीकडे 
n रामजन्मभूमी परिसरात पाहुण्यांना तीन ते चार तास बसावे लागू शकते. 
n पंतप्रधान तेथून गेल्यानंतरच सर्व पाहुण्यांना रामलल्लाचे दर्शन करता येईल. 
n वृद्ध साधू-संतांनी प्राणप्रतिष्ठा समारंभात येण्याऐवजी फेब्रुवारीमध्ये यावे. त्यावेळी त्यांचा यथोचित सन्मान होईल. 
n परिसराची सुरक्षा एसपीजीकडे असून, त्यात कोणाचाही हस्तक्षेप नसतो.

Web Title: Saints are prohibited from bringing fines, umbrellas and sandals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.