‘लष्कर’च्या तळाची जबाबदार सज्जादकडे

By admin | Published: August 28, 2015 11:51 PM2015-08-28T23:51:07+5:302015-08-28T23:51:07+5:30

बारामुल्ला जिल्ह्णातील रफियाबादमध्ये बुधवारी रात्रभर चाललेल्या चकमकीनंतर भारतीय सुरक्षा दलाच्या जिवंत हाती लागलेला आणखी एक पाकिस्तानी अतिरेकी सज्जाद

Sajjad, responsible for the bottom of the 'Army' | ‘लष्कर’च्या तळाची जबाबदार सज्जादकडे

‘लष्कर’च्या तळाची जबाबदार सज्जादकडे

Next

श्रीनगर : बारामुल्ला जिल्ह्णातील रफियाबादमध्ये बुधवारी रात्रभर चाललेल्या चकमकीनंतर भारतीय सुरक्षा दलाच्या जिवंत हाती लागलेला आणखी एक पाकिस्तानी अतिरेकी सज्जाद अहमद याच्यावर ‘लष्कर-ए-तोयबा’ने एक विशेष कामगिरी सोपवली होती. रफियाबादेत ‘लष्कर-ए-तोयबा’चा एक तळ स्थापन करण्याची जबाबदारी त्याला देण्यात आली होती. याशिवाय स्थानिक अतिरेकी कय्युम नज्जर याचा प्रभाव कमी करण्याचे कामही त्याला सोपवण्यात आले होते.
कय्युम नज्जर याने हिज्बुल मुजाहिदीनपासून तुटून आपली वेगळी अतिरेकी संघटना बनवली होती. नज्जरच्या संघटनेमुळे रफियाबादमध्ये ‘लष्कर-ए-तोयबा’चा प्रभाव गेल्या काही दिवसांपासून कमी झाला होता. तो वाढविण्यासाठी सज्जाद अहमदला पाठवण्यात आले होते. सज्जद हा २०१२ मध्ये ‘लष्कर-ए-तोयबा’त सामील झाला होता. यापूर्वी पाकव्याप्त काश्मिरातून काश्मीर खोऱ्यात घुसखोरी करण्याचे दोन प्रयत्न त्याने केले होते;
मात्र मोठ्या प्रमाणात तैनात भारतीय जवानांमुळे तो यात अपयशी ठरला होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तो बलूच आहे आणि तो नैऋत्य पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुजफ्फरगड येथील रहिवासी आहे. बारामुल्ला जिल्ह्णातील रफियाबादमध्ये नियंत्रण रेषेजवळ बुधवारी रात्रभर चाललेल्या चकमकीनंतर लष्कराने सज्जाद अहमदला अटक केली होती.

२२ वर्षांचा पाकी अतिरेकी सज्जाद अहमदला तीन प्रकारणे अतिरेकी प्रशिक्षण मिळाले आहे. त्यात ए आम, दौरा ए खास आणि दौरा ए सूफा याचा समावेश आहे. दौरा ए आममध्ये लहान शस्त्रास्त्रे, ग्रेनेड फेकण्याचे प्रशिक्षण दिले जाते.
दौरा ए खास तीन महिन्यांचे विशेष प्रशिक्षण आहे. यात रायफल, रॉकेट लाँचर, स्फोटक उपकरणे बनवणे आणि एलएमजी चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. तिसऱ्या आणि शेवटच्या दौरा ए सूफामध्ये अतिरेकी कारवायांसाठी युवकांना प्रेरित करण्याचे काम सोपवले जाते.

पाच दिवसांची कोठडी
पाकिस्तानी अतिरेकी सज्जाद अहमद याची श्रीनगर येथील एका न्यायालयाने शुक्रवारी पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली. सज्जादला शुक्रवारी सोपोरच्या एका न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले.त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी बजावली.

Web Title: Sajjad, responsible for the bottom of the 'Army'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.