Sakshi Maharaj: "स्वतःच्या सुरक्षेसाठी घरात धनुष्यबाण ठेवा"; भाजप खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 08:58 AM2022-04-25T08:58:28+5:302022-04-25T08:58:42+5:30
Sakshi Maharaj Controversial Post: ''जिहादी तुमच्या घरात घुसले तर पोलीस वाचवायला येणार नाहीत, ते कुठेतरी लपून बसतील.''
Sakshi Maharaj Controversial Post:उत्तर प्रदेशमधील उन्नावचे लोकसभा खासदार आणि भाजपचे फायरब्रँड नेते डॉ. साक्षी महाराज(Sakshi Maharaj) आपल्या वक्तृत्वामुळे अनेकदा चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते फेसबुकवर प्रक्षोभक वक्तव्य पोस्ट केल्याने चर्चेत आले आहेत. पोस्टमध्ये त्यांनी लोकांना सुरक्षेचा सल्ला दिला आहे. तसेच, त्यांनी पोलिसांना भ्याड म्हटले आहे.
'पोलीस वाचवायला येणार नाहीत'
साक्षी महाराज यांनी फेसबुकवर एका विशिष्ट समुदायातील लोकांचे छायाचित्र शेअर केले आहे. तसेच, पोस्टमध्ये लिहिले की, 'जर ही गर्दी अचानक तुमच्या रस्त्यावर किंवा तुमच्या घरात आली, तर तुमच्याकडे यापासून बचाव करण्याचा काही तरी मार्ग असायला हवा. तसे नसेल तर सुरक्षेचा मार्ग शोधा. पोलीस तुम्हाला वाचवायला येणार नाहीत, ते स्वत:ला वाचवण्यासाठी कुठेतरी लपून बसतील.'
'दरात बाण ठेवा'
ते पुढे म्हणाले, 'जेहाद करून हे लोक परत जातील, तेव्हा पोलीस लाठी घेऊन येतील आणि काही दिवसांनी तपास समितीकडे जाऊन प्रकरण संपेल. अशा पाहुण्यांसाठी थंड पेयांसोहत घरात धनुष्यबाण असायला हवा. हा संदेश कोणत्याही एका राज्यासाठी नसून संपूर्ण देशासाठी आहे, जय श्री राम.'
अशी विधाने यापूर्वीही दिली आहेत
भाजप खासदाराचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा दिल्लीतील जहांगीरपुरी भागात झालेल्या हिंसाचारावरून तणाव कायम आहे. हनुमान जयंती आणि रामनवमी दरम्यान गुजरात, दिल्ली, महाराष्ट्र, मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये हिंसाचार झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. दरम्यान, साक्षी महाराज यांनी यापूर्वीही अशी विधाने केली आहेत.