साक्षी मलिक : बस कंडक्टरच्या मुलीची ऑलिम्पिक पदकानंतर आणि आता लग्नानंतरही कुस्तीत घोडदौड सुरूच
By Admin | Published: May 12, 2017 05:19 PM2017-05-12T17:19:20+5:302017-05-12T17:48:07+5:30
वडिलांना नाकारलं होतं प्रमोशन. ऑलिम्पिक पदक मिळविण्यापूर्वी होती साधी क्लार्क. साक्षी मलिकचा प्रवास. जाणून घ्या तिच्या आयुष्यातील 13 खास गोष्टी
- मयूर पठाडे
रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेत्या साक्षी मलिकनं आपलं विजयी अभियान कायम राखताना सध्या दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेतही 58 किलो गटात आपलं पदक निश्चित केलं आहे. बस कंडक्टरच्या या मुलीनं लग्नानंतरही देशाचा झेंडा उंचावत नेला आहे.
2016च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून साक्षीनं इतिहास घडवताना कुस्तीत ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविणारी पहिली भारतीय महिला म्हणून देशाचं नाव उंचावलं होतं.
रिओ ऑलिम्पिकनंतर गेल्याच महिन्यात 2 एप्रिल 2017 रोजी साक्षीनं हरयाणाचाच प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय मल्ल सत्यव्रत कादियनबरोबर विवाह केला होता.
ऑलिम्पिक आणि विवाहानंतरची ही तिची पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. आपल्यातली जिद्द पुन्हा एकदा दाखवून देताना तिनं पदकाची निश्चिती केली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिच्याच मैत्रिणी विनिश फोगाट (55 किलो) आणि दिव्या काकरान (69 किलो) यांनीही आपलं किमान रौप्य पदक निश्चित केलं आहे.
साक्षीचं नाव आज जगभर झालं असलं तरी तिचा हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता.
कसा झाला साक्षीचा प्रवास?
8- साक्षी रेल्वेच्या दिल्ली डिव्हिजनमध्ये नोकरीला होती. ऑलिम्पिक पदक मिळेपर्यंत ती तिथे साध्या क्लर्कपदावर होती. त्यानंतर तिला गॅझेटेड ऑफिसर म्हणून बढती देण्यात आली होती.
9- आपल्या हक्कांची लढाई लढताना रोहतक येथील महर्षी दयानंद यनिव्हर्सिटीत साक्षी मलिकला ‘खेल निर्देशक’ पदावर नोकरी देण्यात आली.
10- फोर्ब्सने साक्षीचा बहुमान करताना आशियातील ‘अंडर थर्टी’तील सफल आणि लोकमान्य लोकांच्या यादीत तिचा समावेश केला.
11 - रोहतकचाच प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय मल्ल सत्यव्रत कादियनसोबत साक्षी गेल्याच महिन्यात रोहतक येथे दि. 2 एप्रिल 2017 रोजी विवाहबद्ध झाली. सत्यव्रतनंही ज्यनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कुस्तीत ब्रांझ पदक पटकावलेलं आहे.
12- लग्नानंतर आठव्याच दिवशी 58 किलो वजनी गटात साक्षी मलिक वर्ल्ड रॅँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचली.
13 साक्षी मलिकला पद्मर्शी आणि खेलर} या सर्वोच्च पुरस्कारानं बहुमानित करण्यात आलं आहे.