'गरीब' खासदारांचे 'अच्छे दिन', दुप्पटीने वाढणार पगार? आज समितीची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2018 08:38 AM2018-01-12T08:38:07+5:302018-01-12T08:42:47+5:30

एकीकडे सर्वसामान्य जनता महागाईच्या खाईत होरपळून निघत असताना  दुसरीकडे लोकप्रतिनिधी लाखभर पगारासाठी पुढे सरसावले आहे. देशातील खासदारांची रग्गड पगारवाढ होण्याची शक्यता

Salary of mps likely to increase double in meeting of the committee today | 'गरीब' खासदारांचे 'अच्छे दिन', दुप्पटीने वाढणार पगार? आज समितीची बैठक

'गरीब' खासदारांचे 'अच्छे दिन', दुप्पटीने वाढणार पगार? आज समितीची बैठक

googlenewsNext

नवी दिल्ली: एकीकडे सर्वसामान्य जनता महागाईच्या खाईत होरपळून निघत असताना दुसरीकडे लोकप्रतिनिधी लाखभर पगारासाठी पुढे सरसावले आहे. देशातील खासदारांची रग्गड पगारवाढ होण्याची शक्यता आहे. राज्यसभा आणि लोकसभेत एकूण 800 खासदार आहेत. त्यांची बेसिक सॅलरी 50000 हून आता 1 लाख रुपये करण्याचा विचार सरकार करत आहे. पगारवाढीसंदर्भात नियुक्त करण्यात आलेल्या समितीची बैठक आज (शुक्रवार) नवी दिल्लीत होणार आहे. यात खासदारांचा पगार दुप्पट करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जुलै 2015 मध्ये खासदारांचं वेतन आणि भत्ते, यासंबंधी सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी भाजपचे वादग्रस्त खासदार आणि सध्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीनं आपल्या अहवालात 60 शिफारशी केल्या आहेत. 2010 पासून खासदारांची पगारवाढ झालेली नाही, तसंच सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना महागाई भत्ताही दिला जात नाही, या मुद्दे लक्षात घेऊन त्यांचा पगार दुपटीनं वाढवावा, असं त्यात ठळकपणे नमूद करण्यात आलं होतं. मात्र सरकारने अंमलात आणला नव्हता. मात्र, आता खासदारांचा पगार 1 लाखापर्यंत करण्याचा सरकारचा विचार असल्याचं समजतं आहे. आज दिल्लीत पगारवाढीसंदर्भात होणा-या बैठकीत खासदारांचा पगार दुप्पट करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खासदारांचे वेतन 50 हजारांवरून 1 लाख, मतदारसंघाचा भत्ता 45 हजारांवरून 90 हजार करण्याची शिफारस समितीने केली आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास खासदारांचे एकूण वेतन आणि भत्ते प्रति महिना 2 लाख 80 हजार इतके होईल.
खासदारांचा पगार 100 टक्क्यांनी वाढवतानाच, माजी खासदारांना दिल्या जाणाऱ्या पेन्शनमध्ये 75 टक्क्यांच्या वाढीची शिफारसही संसदेच्या समितीनं केली आहे. त्या सोबतच, सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार निश्चित करण्यासाठी जसा वेतन आयोग असतो, त्याचप्रमाणे ठरावीक काळानं खासदारांच्या पगाराचा आढावा घेणारी यंत्रणा निर्माण करण्याची शिफारसही समितीनं केंद्राला केली आहे. 

Web Title: Salary of mps likely to increase double in meeting of the committee today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.