Seema Haider : 1 लाख पगार, चित्रपटाची ऑफर अन् YouTube वरून कमाई; सचिन-सीमाला लागली मोठी लॉटरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 10:14 AM2023-08-02T10:14:07+5:302023-08-02T10:31:31+5:30

Seema Haider : सचिनसाठी सीमा पाकिस्तानातून पळून भारतात आली. या दोघांसाठी आता तीन गुड न्यूज समोर आल्या आहेत.

salary of 1 lakh film offer earning from youtube sachin meena and Seema Haider got lottery | Seema Haider : 1 लाख पगार, चित्रपटाची ऑफर अन् YouTube वरून कमाई; सचिन-सीमाला लागली मोठी लॉटरी

Seema Haider : 1 लाख पगार, चित्रपटाची ऑफर अन् YouTube वरून कमाई; सचिन-सीमाला लागली मोठी लॉटरी

googlenewsNext

सीमा हैदर आणि सचिन मीणा यांच्या लव्हस्टोरीची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. सचिनसाठी सीमा पाकिस्तानातून पळून भारतात आली. या दोघांसाठी आता तीन गुड न्यूज समोर आल्या आहेत. पहिली आनंदाची बातमी म्हणजे गुजरातमधील एका व्यावसायिकाने त्यांना नोकरीची ऑफर दिली आहे. दोघांनाही पन्नास हजार रुपये महिना पगारावर नोकरी दिली जाईल, असे व्यावसायिकाच्या बाजुने सांगण्यात आले.

सीमा-सचिनचे कुटुंब आर्थिक संकटात सापडल्याची माहिती समोर येताच गुजराती व्यावसायिकाने त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. त्याने दोघांना 50-50 हजार रुपये दरमहा नोकरी देऊ केली. म्हणजे सीमा सचिन त्या व्यावसायिकासोबत काम करून महिन्याला एक लाख रुपये कमवू शकतील.

सीमाला चित्रपटात काम करण्याची ऑफर

दुसरी आनंदाची बातमी म्हणजे अलीकडेच चित्रपट दिग्दर्शक अमित जानीनेही सीमाला आपल्या एका चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली आहे. तो सीमाच्या घरी जाऊन एडवान्स चेक देण्यासही तयार होता. मात्र, या ऑफरवर सीमा-सचिनच्या कुटुंबीयांनी त्यांच्याविरोधातील तपास पूर्ण होईपर्यंत असे काहीही करणार नसल्याचे सांगितले होते.

यूट्यूब-इन्स्टाग्रामवरून कमाई

सीमा आणि सचिन हे दोघेही इतके प्रसिद्ध झाले आहेत की त्यांच्या इन्स्टाग्राम आणि यूट्यूब चॅनेलचे सबस्क्राइबर्सही खूप वाढू लागले आहेत. अनेक युजर्स त्यांना फॉलो करत आहेत. जर युजर्स वाढत राहिले तर ते तिथूनही कमाई करू शकतात. दोघांनाही रील बनवण्याची खूप आवड आहे.

सीमाने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले की, “याआधी मी माझे इन्स्टाग्राम अकाउंट प्रायव्हेट ठेवले होते. पण जेव्हा मला कळले की लोक आमचे व्हिडीओ शेअर करून पैसे कमवत आहेत, तेव्हा मी माझे इन्स्टाग्राम अकाउंट सार्वजनिक केले. जेणेकरून लोक मला फॉलो करू शकतील. मग आम्ही आमच्या व्हिडिओद्वारे पैसे देखील मिळवू शकतो. यामुळे सचिनच्या कुटुंबालाही आर्थिक मदत होणार आहे. कारण घरात तो एकटाच कमावतो. घरात दुसरे कोणी कमावणार नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: salary of 1 lakh film offer earning from youtube sachin meena and Seema Haider got lottery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.