लॉटरी लागली! दीड लाख पगार, राहण्याची सोय; इस्त्रायलला १ लाख कामगार अर्जंट लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 04:06 PM2023-12-29T16:06:10+5:302023-12-29T16:06:33+5:30

इस्त्रायल सरकारने भारत सरकारकडे सुमारे १ लाख कामगारांची मागणी नोंदविली आहे. भारतानेही उपयोगी पडणाऱ्या इस्त्रायलला सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

Salary of one and a half lakhs to labourers, accommodation; Israel will urgently need 1 lakh workers, central govt serching in UP | लॉटरी लागली! दीड लाख पगार, राहण्याची सोय; इस्त्रायलला १ लाख कामगार अर्जंट लागणार

लॉटरी लागली! दीड लाख पगार, राहण्याची सोय; इस्त्रायलला १ लाख कामगार अर्जंट लागणार

मजुरांना दीड लाख पगार ते देखील राहण्याच्या सोईसकट, अशी कुठे ऑफर ऐकलीय का? इथे मोठमोठ्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना एवढा पगार मिळत नसताना सुमारे १ लाख भारतीय बांधकाम मजुरांना लॉटरी लागणार आहे. हमासच्या हल्ल्यात उध्वस्त झालेल्या इमारती आणि रस्ते आदी सुविधा निर्माण करण्यासाठी इस्त्रायलला मोठ्या प्रमाणावर कामगारांची गरज भासली आहे. 

इस्त्रायल सरकारने भारत सरकारकडे सुमारे १ लाख कामगारांची मागणी नोंदविली आहे. भारतानेही उपयोगी पडणाऱ्या इस्त्रायलला सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. पुढील काही महिन्यांत एकट्या उत्तर प्रदेशमधून ४० हजार मजुर इस्त्रायलला पाठविले जाणार आहेत. 

केंद्र सरकारने यावर हालचाली करण्यास सुरुवात केली असून कामगार व सेवा नियोजन विभागाने कामगार शोधण्यास सुरुवात केली आहे. युपीतील सर्व जिल्ह्यांतील इच्छुक कामगारांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. एक टेस्ट पास केल्यानंतर या कामगारांना इस्त्रायलला पाठविले जाणार आहे. 

हमासने इस्त्रायलवर हल्ला केल्यानंतर पॅलेस्टिनी नागरिकांचे वर्क परमिट रद्द करण्यात आले आहे. यामुळे इस्त्रायलमध्ये कामगारांचा तुटवडा भासू लागला आहे. त्यातच बांधकाम क्षेत्रालाही मोठ्या प्रमाणावर कामगारांची गरज आहे. बांधकाम कामगारांना NSDC (नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) इंटरनॅशनल मार्फत इस्रायलला पाठवले जाईल. यासाठी उच्च माध्यमिक शिक्षण या कामगारांनी घेतलेले असणे गरजेचे आहे. तसेच वयोमर्यादा २१ ते ४५ या दरम्यान ठेवण्यात आली आहे. 

इस्रायलला जाणाऱ्या कामगारांना दर महिन्याला 6100 इस्रायली नवीन शेकेल चलन मिळेल. भारतीय चलनात बघितले तर ते सुमारे 1 लाख 37 हजार 260 रुपये होतात. या कामगारांना इस्त्रायल सरकार निवासस्थान देखील देणार आहे. 

Web Title: Salary of one and a half lakhs to labourers, accommodation; Israel will urgently need 1 lakh workers, central govt serching in UP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.