नवरात्री उत्सवात वाहन बाजार सुसाट घटस्थापनेचा साधला मुहूर्त: ६५० दुचाकी तर ५० कारची विक्री
By admin | Published: October 14, 2015 09:02 PM2015-10-14T21:02:40+5:302015-10-14T23:02:31+5:30
जळगाव- नवरात्री उत्सवाचा मुहूर्त साधत नागरिकांनी दुचाकी आणि चारचाकी वाहनांची जोरदार खरेदी केली़ यामुळे वाहन बाजारात चांगलीच तेजी अनुभवास आली़
जळगाव- नवरात्री उत्सवाचा मुहूर्त साधत नागरिकांनी दुचाकी आणि चारचाकी वाहनांची जोरदार खरेदी केली़ यामुळे वाहन बाजारात चांगलीच तेजी अनुभवास आली़
घटनस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर दुचाकी आणि चारचाकी वाहन बाजारातून ६५० दुचाकी तर ५० चारचाकी वाहनांची विक्री झाली आहे़ तर ४० चारचाकी वाहनांची ग्राहकांकडून बुकिंग करण्यात आली आहे़ अनेक दिवसांनतर नवरात्री उत्सवामुळे बाजारात चैतन्याचे वातावर निर्माण झाले असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे़ आठवडाभरात दुचाकींच्या विक्रीचा आकडा हजारांच्या वर पोहोचेल असे जाणकारांचे मानणे आहे़
४०० दुचाकींची बुकिंग
दसर्याच्या मुहूर्तावर वाहनाची खरेदी करण्यासाठी घटस्थापनेच्या दिवशी ग्राहकांनी विविध विविध कंपन्यांच्या शोरूमध्ये ४०० दुचाकींची बुकिंग केली आहे़ यात विविध कंपन्यांच्या वाहनांचा समावेश आहे़
इलेक्ट्रॉनिक बाजारातही चैतन्य
वाहनांसोबतच इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या खरेदीकडे नागरिक वळत असल्याने दिसून येत आहे़त्यामुळे इलेक्ट्रॉनिक बाजारातही चैतन्याचे वातावरण अनुभवास येत आहे़ नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमिवर वाहनांसोबत टी.व्ही., फ्रीज, वॉशिंग मशिन विक्रेत्यांनी बाजारात नव-नवीन मॉडेल्स विक्रीसाठी आणलेले आहेत़ शोरूमध्ये विशेष सजावट केली आहे़ शिवाय काही विक्रेत्यांकडे नवरात्रीसाठी विशेष खरेदी ऑफरर्स उपलब्ध आहेत़ त्यामुळे बाजारात चैतन्य निर्माण झाले असून मोठी उलाढाल होत असल्याचे दिसून येत आहे़
नवरात्री उत्सवात शोरूमध्ये ४०० दुचाकींचह विक्री करण्यात आली़ तर १५० वाहनांची फ्रेश बुकींग झालेली आहे़ बर्याच दिवसानंतर चांगले वातारण वाहन बाजारात अनुभवास येत आहे़
चंचल चौधरी, सेल्स मॅनेजर, राम होंडा
चारचाकी वाहनांच्या खरेदीसाठी ग्राहक शोरूमकडे वळत आहेत़ चैतन्याचे वातावरण आहे़ घटस्थापनेच्या दिवशी ४१ चारचाकी वाहनांची विक्री झाली़ तर २२ वाहनांची बुकिंग करण्यात आली आहे़
उज्वला खरपे, सेल्स मॅनेजर, मानराज मोटर्स