बनावट औषधाची विक्री, एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2016 12:19 AM2016-06-20T00:19:14+5:302016-06-20T00:19:14+5:30

जळगाव: प्रिया फार्मासिटीकल्स या नावाने बनावट आयुर्वेदीक औषध तयार करुन त्याची विक्री करुन फसवणूक करणार्‍या जयंत अनंत शिंदे (वय ५२ रा.ढाकेवाडी) याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. धुळे येथील अन्न व औषध प्रशासनाने त्याच्या घरी धाड टाकून चार हजार ३५० रुपयांचे बनावट औषध जप्त केले आहे. त्याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून

Sale of counterfeit drugs, one arrested | बनावट औषधाची विक्री, एकास अटक

बनावट औषधाची विक्री, एकास अटक

Next
गाव: प्रिया फार्मासिटीकल्स या नावाने बनावट आयुर्वेदीक औषध तयार करुन त्याची विक्री करुन फसवणूक करणार्‍या जयंत अनंत शिंदे (वय ५२ रा.ढाकेवाडी) याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. धुळे येथील अन्न व औषध प्रशासनाने त्याच्या घरी धाड टाकून चार हजार ३५० रुपयांचे बनावट औषध जप्त केले आहे. त्याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून
ढाकेवाडीतील जयंत शिंदे हे मेसर्स मंदार आयुर्वेदीक प्रॉडक्ट नावाचे बनावट औषध गुजरातमधील कबीलपुर (जि.नवसारी) यांच्या प्रिया फार्मासिटीकल्स या नावाने विक्री करीत असल्याची तक्रार कंपनीने धुळे येथील अन्न व औषध प्रशासनाकडे केली होती. औषध निरीक्षक श्याम साळे यांनी एमआयडीसी पोलिसांची मदत घेवून शनिवारी रात्री ढाकेवाडी शिंदे याच्या घरावर धाड टाकली. यावेळी प्लस्टीकच्या पांढर्‍या रंगात डबीत चार हजार ३५० रुपये किमतीची बनावट आयुर्वेदीक औषध मिळून आली. त्याच्या घरातून ती जप्त करण्यात आली. घटनास्थळाचा पंचनामा करुन शिंदे यांच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. औषध निरीक्षक श्याम साळे यांनी फिर्याद दिली आहे.

Web Title: Sale of counterfeit drugs, one arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.