दुर्दैवी! तीन मुलांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी आईने विकले केस
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 16:11 IST2020-01-10T16:01:08+5:302020-01-10T16:11:53+5:30
मुलांच्या सुखासाठी आई-वडील सर्व गोष्टी करत असतात. अशीच एक घटना तमिळनाडूतील सलेममध्ये घडली आहे.

दुर्दैवी! तीन मुलांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी आईने विकले केस
सलेम - मुलांच्या सुखासाठी आई-वडील सर्व गोष्टी करत असतात. अशीच एक घटना तमिळनाडूतील सलेममध्ये घडली आहे. मुलांचं पोट भरण्यासाठी एका महिलेने आपले केस विकल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमा असं 31 वर्षीय महिलेचं नाव असून ती तामिळनाडूच्या सलेममध्ये राहते. कर्जामुळे प्रेमाच्या पतीने काही माहिन्यांपूर्वी आत्महत्या केली आहे. त्यामुळे तीन मुलांच्या पालनपोषणाची संपूर्ण जबाबदारी प्रेमावर आहे.
सात महिन्यांपूर्वी कर्जामध्ये असल्याने प्रेमाच्या पतीने आत्महत्या केली. त्यानंतर आर्थिक परिस्थिती बिकट असताना देखील ती आपल्या मुलांचा सांभाळ करत आहे. मात्र मुलांचे पोट भरण्यासाठी पैसेच शिल्लक नसल्याने प्रेमावर आपले केस विकण्याची वेळ आली. 150 रुपयांमध्ये तिने आपले केस विकले. प्रेमाचा एक मुलगा पाच वर्षांचा, दुसरा तीन आणि तिसरा दोन वर्षांचा आहे. मात्र पैसे नसल्याने अशा स्थितीत मुलांचा सांभाळ कसा करायचा असा प्रश्न तिच्यासमोर होता. तिने शेजारी, नातेवाईक तसेच अनेक व्यक्तींकडे मदतीचा हात मागितला पण कोणीच तिला मदत करायला तयार झाले नाही.
रस्त्यावरून जात असलेल्या एका व्यक्तीने विग तयार करणाऱ्या व्यक्तीला केस दिल्यास तो त्याबदल्यात पैसे देईल असं प्रेमाला सांगितलं. त्यानुसार तिने 150 रुपयांत आपले केस विकले. दीडशे रुपयांपैकी 100 रुपयांचे प्रेमाने मुलांसाठी खाद्यपदार्थ घेतले. मात्र परिस्थितीला कंटाळून तिने आत्महत्या करण्याचा विचार केला. म्हणूनच ती कीटकनाशक घेण्यासाठी दुकानावर गेली. पण दुकानदाराला संशय आल्याने त्याने तिला कीटकनाशक देण्यास नकार दिला.
कीटकनाशक न मिळाल्याने प्रेमाने विषारी बिया खावून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र तिच्या बहिणीने तिला असं करण्यापासून रोखलं. मन हेलावून टाकणारी प्रेमाची ही कहाणी ग्राफिक्स डिझायनर जी. बाला यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ही पोस्ट व्हायरल झाली आणि यानंतर प्रेमाला मदत करण्यासाठी लोक पुढे सरसावले आहेत. जवळपास तिला आतापर्यंत 1.45 लाख रुपयांची मदत मिळाली आहे. तसेच सेलम जिल्हा प्रशासनाने प्रेमाला विधवा महिलांना देण्यात येणारी महिन्याची पेन्शनही लागू केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
भाजपाच्या बैठकीत खडसे समर्थक पदाधिकाऱ्याला मारहाण; दानवे, महाजनांसमोर कार्यकर्त्यांचा राडा
भूकंप शब्द बदलला अन् राजकीय भूकंप टळला; वडेट्टीवारांची नाराजी दूर
मुंबई महापालिकेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचा विजय, भाजपा पराभूत
जम्मू-काश्मीरमधील इंटरनेट बंदीवरुन सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला खडे बोल
शाळकरी मुलांच्या आईच्या खात्यात थेट जमा होणार 15 हजार; आंध्र प्रदेश सरकारची नवी योजना