सलमानवर लागले होते ६०० कोटी

By admin | Published: December 10, 2015 06:14 PM2015-12-10T18:14:48+5:302015-12-10T18:19:02+5:30

अभिनेता सलमान खानची मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष सुटका केल्यानंतर कुटुंबिय, मित्र, हितचिंतक, चाहत्यांप्रमाणे अनेक निर्मात्यांनाही सुटकेचा निश्वास सोडला आहे.

Salman had started around 600 crores | सलमानवर लागले होते ६०० कोटी

सलमानवर लागले होते ६०० कोटी

Next

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १० - अभिनेता सलमान खानची मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष सुटका केल्यानंतर कुटुंबिय, मित्र, हितचिंतक, चाहत्यांप्रमाणे अनेक निर्मात्यांनाही सुटकेचा निश्वास सोडला आहे. सलमानवर बॉलिवुडचे सध्या ६०० कोटी रुपये लागले आहेत. शुद्धी, सुल्तान, नो एंट्री मे एंट्री हे सलमानचे आगामी चित्रपट पुढच्या एक दोन वर्षात प्रदर्शित होणार आहेत. त्यातील सुल्तानचे चित्रीकरण सुरु झाले आहे. 

शुद्धी 
करण जोहरची निर्मिती असलेल्या शुद्धी चित्रटात सलमान मुख्य भूमिकेत आहे. आधीच या चित्रपटाला वर्षभराचा विलंब झाला आहे. करीना कपूर आणि हतिक रोशन बाहेर पडल्यामुळे आधीच या चित्रपटाला विलंब झाला आहे. 
सुल्तान 
एक था टायगरनंतर सलमान पुन्हा एकदा यशराज फिल्मसोबत सुल्तान चित्रपट करत आहे. एका ४० वर्षाच्या बायकरची भूमिका सलमानने या चित्रपटात केली आहे. सलमानच्या चाहत्यांसाठी  खास अॅक्शन सीन्सची मेजवानी या चित्रपटात आहे. एक था टायगरने २०० कोटीची कमाई केली होती. सुल्तान यापेक्षा जास्त कमाई करेल अशी निर्मात्यांना अपेक्षा आहे. त्यामुळे हिट अँड रनच्या निकालावर सर्वकाही अवलंबून होते. 
नो एंट्री में एंट्री 
नो एंट्रीच्या प्रचंड यशानंतर बोनी कपूरने 'नो एंट्री में एंट्री' चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटात सलमानची मुख्य भूमिका आहे. त्यामुळे करण, आदित्य प्रमाणे बोनी कपूरही हिट अँड रनच्या निकालाबद्दल चिंतित होता.  

Web Title: Salman had started around 600 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.