साक्ष बदलण्यासाठी सलमानकडून पैशांचे आमिष, भाजप नेत्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2018 09:28 PM2018-04-08T21:28:57+5:302018-04-08T21:28:57+5:30
सलमानने कोणते पुण्याचे काम केलेले नाही, कोणते चांगले काम केलेले नाही. त्याने काळवीटाची शिकार केली आहे
नवी दिल्ली - काळवीट शिकारप्रकरणी अटक करण्यात आलेला सलमान खानला दोन दिवसात जामीन मंजूर झाला. भाजपाचे नेते कैलाश विजयवर्गीय यांनी सलमान खानवर गंभीर आरोप केला आहे. सलमान खान पैशांच्या बळावर साक्षीदार खरेदी करण्याचा प्रयत्न करत होता, असा आरोप त्यांनी केला आहे. इंदूरमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
सलमानने कोणते पुण्याचे काम केलेले नाही, कोणते चांगले काम केलेले नाही. त्याने काळवीटाची शिकार केली आहे आणि याबद्दल त्याला शिक्षाही सुनावण्यात आली. तरही त्याला अटक केल्यापासून टीव्हीवर सगळीकडे त्याच्याच बातम्या दाखवत आहेत. यावेळी कैलाश विजयवर्गीय यांनी बिश्नोई समाजाचे कौतुक केले. ते म्हणाले की, ज्या शेतकऱ्यांकडे 2 एकर, 5 एकर शेती आहे त्यांनी सलमानविरोधात साक्ष दिली. साक्ष बदलण्यासाठी सलमान खान नोटांची बंडलं घेऊन त्यांच्याकडे गेला होता, परंतु शेतकरी आपल्या साक्षिवर टिकून राहिले आणि विकले गेले नाहीत.
From past 2 days,TV channels are only talking about Salman Khan.He killed a deer&was punished, because a farmer of the village complained about it.Khan went with bundle of notes to the farmer,but he didn't sell himself.Channels aren't showing that farmer: Kailash Vijayvargiya,BJP pic.twitter.com/m73qSiVsOY
— ANI (@ANI) April 7, 2018