काळवीट शिकारप्रकरणी सलमान खानने आत्मसमर्पण करावे

By admin | Published: October 19, 2016 11:21 PM2016-10-19T23:21:11+5:302016-10-19T23:21:11+5:30

काळवीट शिकारप्रकरणी अभिनेता सलमान खानने आत्मसमर्पण करावे आणि तुरुगांत जावे अशी भूमिका राजस्थान सरकारने सर्वोच्च न्यायलयात मांडली

Salman Khan surrendered in blackbuck hunting | काळवीट शिकारप्रकरणी सलमान खानने आत्मसमर्पण करावे

काळवीट शिकारप्रकरणी सलमान खानने आत्मसमर्पण करावे

Next

ऑनलाइन लोकमत

जोधपूर, दि. 19 - काळवीट शिकारप्रकरणी अभिनेता सलमान खानने आत्मसमर्पण करावे आणि तुरुगांत जावे अशी भूमिका राजस्थान सरकारने सर्वोच्च न्यायलयात मांडली आहे. मंगळवारी सलमानच्या सुटकेच्या निर्णयाविरोधात राजस्थान सरकारने याचिका दाखल केली होती यावेळी सरकारने ही भूमिका मांडली.  

 
1998 मध्ये ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान कंकणीजवळ सलमान, सैफ अली खान, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम  यांच्यावर चिंकारा काळविटाची शिकार केल्याचा आरोप आहे. बिष्णोई समाजाने केलेल्या तक्रारीनंतर  2 ऑक्टोबर 1998 रोजी याप्रकरणी सलमानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापुर्वी याप्रकरणी सलमानने 5 दिवसांसाठी तुरूंगवासही भोगला आहे. 

Web Title: Salman Khan surrendered in blackbuck hunting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.