अवैधरित्या शस्त्रं बाळगल्याप्रकरणी सलमानचा होणार आज 'फैसला'
By admin | Published: January 18, 2017 08:00 AM2017-01-18T08:00:34+5:302017-01-18T08:48:47+5:30
परवाना संपल्यानंतरही बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याप्रकणी अभिनेता सलमान खानविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज निर्णय सुनावण्यात येणार आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
जोधपूर, दि. १८ - अवैधरित्या शस्त्रास्त्रं बाळगल्याप्रकरणी अभिनेता सलमान खानविरोध दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर जोधपूर न्यायालय आज फैसला देणार आहे. कोर्ट काय निकाल सुनावतं, सलमानला शिक्षा होते की नाही याकडेच सर्वांचे लक्ष लागले असून सलमान खान जोधपूरमध्ये दाखल झाला असून आज तो सुनावणीसाठी कोर्टात उपस्थित राहणार आहे.
'हम साथ साथ है' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान, म्हणजेज १९९८ साली परवाना संपलेले शस्त्र बेकायदेशीररित्या वापरल्याबद्दल जोधपूर पोलिसांनी सलमान खान विरोधात शस्त्रास्त्र कायद्याखाली गुन्हा नोंदवला होता. गेल्या वर्षी 9 डिसेंबरपासून अंतिम सुनावणीला सुरुवात झाली होती. अखेर आज याप्रकरणी निर्णय सुनावण्यात येणार आहे. न्यायालयाने सलमानला दोषी ठरवल्यास त्याला सात वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
नक्की काय आहे प्रकरण?
परवाना संपलेली शस्त्र बाळगल्याचा आरोप सलमानवर लावण्यात आला आहे. त्याच्याकडे असलेल्या दोन्ही शस्त्रांचा परवाना 22 सप्टेंबर 1998 रोजी संपला होता. मात्र त्याने या शस्त्रांनी 1 आणि 2 ऑक्टोबर 1998 रोजी काळवीटांची शिकार केली, असा आरोप याचिकाकर्त्याने केला होता. दरम्यान सलमानची ही शस्त्र चोरी गेली अशी तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र तपासादरम्यान त्याच्या हॉटेलच्या रुममध्ये शस्त्र आढळली, असेही याचिकाकर्त्याने नमूद केले होते. शिवाय काळवीटांचा मृत्यू गोळी लागूनच झाल्याचा शवविच्छेदन अहवालही याचिकाकर्त्याने कोर्टासमोर सादर केला आहे.