सलमानचे महिला आयोगाच्या नोटीसला उत्तर, नाही मागितली माफी

By admin | Published: June 29, 2016 02:01 PM2016-06-29T14:01:31+5:302016-06-29T17:02:07+5:30

स्वत:ची बलात्कार पिडित महिलेशी तुलना करण्याच्या वक्तव्याबद्दल सलमानने माफी मागितलेली नाही.

Salman's Women's Commission's reply to the reply, no apology | सलमानचे महिला आयोगाच्या नोटीसला उत्तर, नाही मागितली माफी

सलमानचे महिला आयोगाच्या नोटीसला उत्तर, नाही मागितली माफी

Next

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २९ - राष्ट्रीय महिला आयोगाने बजावलेल्या नोटीसला सलमान खानने उत्तर दिले आहे. पण स्वत:ची बलात्कार पिडित महिलेशी तुलना करण्याच्या वक्तव्याबद्दल सलमानने माफी मागितलेली नाही. सुल्तानच्या चित्रीकरणानंतर इतका थकून जायचो की, बलात्कार झालेल्या महिलेसारख वाटायचं असा वादग्रस्त वक्तव्य त्याने केलं होतं. 
 
एका मुलाखतीमध्ये सलमानला चित्रीकरणाच्या अनुभवाबद्दल विचारण्यात आले. त्यावर बोलताना सलमानने सहा तास सलग शुटींग करताना अनेक वेळा मैदानावर उचलणं, आपटणं चालू असायचं. मला हे फारच कठीण गेलं. कारण 120 किलो वजनाच्या व्यक्तीला मला 10 वेळा आणि तेदेखील 10 वेगवेगळ्या अँगलने उचलावं लागायचं. 
 
आणखी वाचा 
सलमान म्हणतो माझी परिस्थिती बलात्कार पिडीत महिलेसारखी, सोशल मिडियावर संताप
बलात्कार पीडितेची सलमान खानला 10 कोटी रुपयांची नोटीस
 
त्याचप्रमाणे मलादेखील उचलून जमिनीवर आपटलं जायचं. ख-या खेळात अशाप्रकारे पुनरावृत्ती केली जात नाही. शूट संपल्यानंतर मी जेव्हा रिंगच्या बाहेर पडायचो तेव्हा मला बलात्कार झालेल्या महिलेसारखं वाटायचं. मला सरळ चालणं शक्य व्हायचं नाही. काहीतरी खायचो आणि ट्रेनिंगसाठी जायचो' असे उत्तर त्याने दिले होते. त्याच्या या वक्तव्यावर सोशल मिडिया, समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यासाठी त्याला राष्ट्रीय महिला आयोगाने नोटीस बजावली होती. 
 
सलमानला ७ जुलै रोजी महिला आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश
 
या वक्तव्याने सलमानने सर्व महिलांचा अपमान केला असून यासंदर्भात त्याला ७ जुलै रोजी महिला आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 
 

Web Title: Salman's Women's Commission's reply to the reply, no apology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.