सलोनी चित्रप्रदर्शन - जोड
By admin | Published: January 24, 2016 10:19 PM2016-01-24T22:19:39+5:302016-01-24T22:19:39+5:30
प्रदर्शनात विविध पेंटिगचे आकर्षण
Next
प रदर्शनात विविध पेंटिगचे आकर्षण सलोनीने प्रत्येक विषयाला न्याय देत आपल्या जादुई कुंचल्याने विविध पेंटिग मेहनतीने तयार करून प्रदर्शनात ठेवल्या आहेत. त्यात ॲक्रेलिक व ऑईल पेंटिग कॅन्व्हासवर तसेच पावडर व पेन्सिल शेडींग असलेले मोर, राधाकृष्ण, गौतम बुद्ध, शिवशंकर, साईबाबा, गणपती, हरीण, लाईट हाऊस, मुन लाईट, निसर्ग चित्र,पोट्रेट, ॲबस्ट्रॅक आदी प्रकारच्या पेंटिंग पाहणार्या आकर्षित करीत आहेत. कोट-बाल वयापासूनच आपल्या मनातील भावना चित्ररुपाने ज्याला मांडता येतात तोच खरा चित्रकार, आणि त्यात संवेदना असणे आवश्यक . एखादा आशय तसेच मनातील संकल्पना चित्रातून स्पष्ट करणे हे मोठे कौशल्य असते. आणि ते सलोनीच्या चित्रातून दिसत असून प्रदर्शनातील सर्व चित्रातून जीवंतपणा जाणवत आहे. ा कौशल्याबरोबरच सलोनीने दुर्लक्षित मुलांसाठी दाखविलेला उदात्तपणादेखील लाखमोलाचा असून लहानांपासून मोठ्यांनी तिचा आदर्श घ्यावा. -ॲड. उज्ज्वल निकम, विशेष सरकारी वकीलसलोनीच्या या प्रयत्नाचा सर्वांना अभिमान वाटत आहे. तिने शिक्षण सांभाळत उपजत कलागुणांना विकसित केले आणि त्याचा उपयोग समाजासाठी करीत असल्याने तिला आई वडीलांचे योगदान मिळत असल्याने त्यांच्या कडून सर्वांनी शिकावे. -प्राचार्या, अलका डिसुझा, सेंट जोसेफ स्कूल गेल्या तीन चार वर्षापासून आम्ही प्रतिष्ठानच्या माध्यमातून एड्सग्रस्त मुलांसाठी धावपड करीत आहेत. मात्र आजपर्यंत आम्हाला जे जमले नाही ते सलोनीने या प्रदर्शनाच्या माध्यमातून घडविले. या प्रयत्नातून त्या विद्यार्थ्यांना सामाजिक स्थान मिळण्यास मदत होईल. -मनिषा बागूल, अंकू र प्रतिष्ठान