कर्तव्यनिष्ठेला सॅल्यूट... एम्बुलन्सला वाट करुन देण्यासाठी 2 किमी धावला ट्रॅफिक हवालदार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2020 04:14 PM2020-11-06T16:14:19+5:302020-11-06T16:14:44+5:30
ट्रॅफिक हवालदार म्हटलं की रस्त्यात गाडी अडवून पावती फाडणारे किंवा काही पैसे दिल्यानंतर गाडी सोडून देणारे, अशीच सर्वसामान्य ओळख ट्रॅफिक हवालदाराची आहे.
हैदराबाद - सोशल मीडियावर एक ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणाता व्हायरल झाला आहे. या व्हिडिओतील पोलीस हवालदार एका एम्ब्युलन्सला रस्ता करुन देण्यासाठी रहदारीने जाम झालेल्या रस्त्यात धावताना दिसत आहे. हैदराबादच्या कोटी परीसरातील हे दृश्य असून सोमवारी सायंकाळी 6 ते 7 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. ट्रॅफिक हवालदाराच्या कर्तव्यनिष्ठेला सोशल मीडियातून सलाम केला जात आहे.
ट्रॅफिक हवालदार म्हटलं की रस्त्यात गाडी अडवून पावती फाडणारे किंवा काही पैसे दिल्यानंतर गाडी सोडून देणारे, अशीच सर्वसामान्य ओळख ट्रॅफिक हवालदाराची आहे. मात्र, हैदराबादमधील एका ट्रॅफिक हवालदाराने आपल्या कर्तव्यातून आपलं कामाची पावती दिली आहे. अति दक्षता विभागातील रुग्णाल घेऊन जाणाऱ्या एम्ब्युल्सनला दवाखान्यात जाण्यासाठी रस्ता मिळावा म्हणून ट्रॅफिक हवालाराने जवळपास दोन किमींची पायपीट केली. एम्बुलन्सला मोकळा रस्ता करण्यासाठी एम्बुलन्सच्या समोर हा ट्रॅफिक पोलीस धावत होता. रस्त्यावरील ट्रॅफिक जाममधील गाड्या बाजूला सारत एम्बलन्ससाठी याने मोकळा रस्ता केला.
बाबाजी असे या ट्रॅफिक हवालदाराचे नाव असून एम्बुलन्सच्या ड्रायव्हरचे होणारी घालमेल पाहून या ट्रॅफिक पोलिसांने रस्ता रिकामा करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्यामुळे एम्बुलन्स रुग्णालयात वेळेत पोहोचली व रुग्णावर वेळेत उपचार सुरू झाले. सध्या सोशल मीडियात या ट्रॅफिक हवालदाराचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून नेटीझन्सने सॅल्यूट केला आहे. एम्बुलन्सचा ड्रायव्हर आणि रुग्णांच्या नातेवाईकांनीही हवालदाराचे आभार मानले आहेत.